मालिकेत काम करत असताना भविष्यात ती नायिका आपली सून बनून आपल्या घरात येईल असा विचार देखील त्यावेळी अभिनेत्रीने केला नसेल. असेच काहीसे मराठी चित्रपट , मालिका अभिनेत्रीबाबत घडले आहे. मुग्धा शाह यांनी बे दुणे साडे चार, मिस मॅच, कर्तव्य, माहेर माझं हे पंढरपूर, पुछो मेरे दिल से, संभव असंभव अशा मराठी मालिकेतून, चित्रपटातून अभिनय साकारला आहे. हिंदी मालिका सृष्टीत त्यांनी बहुतेकदा नायक नायिकेच्या आईची भूमिका निभावली आहे. तर मराठी चित्रपटात देखील त्यांनी सहाय्यक तसेच विरोधी भूमिका साकारलेल्या पाहायला मिळतात.

त्यामुळे मराठी सृष्टीत देखील मुग्धा शाह यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेला दिसून येतो. अशातच दुर्वा मालिकेत त्यांनी हृता दुर्गुळे सोबत काम केले होते. २०१३ ते २०१६ या कालावधीत स्टार प्रवाह वाहिनीवर दुर्वा मालिका प्रसारित होत होती. यात हृताने मुख्य नायिकेची भूमिका साकारली होती. याच मालिकेत मुग्धा शाह यांनी हृताच्या आईची भूमिका निभावली होती. मालिकेत माय लेकीची भूमिका निभावणाऱ्या या दोघीजणी खऱ्या आयुष्यात आता सासू सुनेची जबादारी पार पाडत आहेत. हृताची सासू म्हणजेच मुग्धा शाह या प्रतिकच्या आई आहेत. प्रतीक शाह उत्कृष्ट डान्सर असून हिंदी मालिका दिग्दर्शक आहे. प्रतीकने काही मालिकांचे दिग्दर्शन केले आहे. त्याने बेहद २, बहू बेगम, कुछ रंग प्यार के ऐसे भी, तेरी मेरी एक जिंदड़ी, इक दिवाना था , मनमोहिनी या गाजलेल्या मालिकांसाठी काम केले आहे. हृताने फुलपाखरू या गाजलेल्या मालिकेतून प्रेक्षकांची मने जिंकली होती. या मालिकेमुळे तिने आपला प्रचंड चाहतावर्ग वाढवलेला पाहायला मिळाला. दुर्वा, मन उडू उडू झालं अशा मालिकांमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला येत राहिली.

अनन्या , टाईमपास ३ या चित्रपटातून हृता मुख्य भूमिका साकारत आहे. हे दोन्ही चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर असल्याने हृताला प्रमोशनसाठी वेळ मिळत नव्हता. या कारणास्तव मन उडू उडू झालं या मालिकेतून तीने काढता पाय घेतला घ्यावा लागत होता तर ह्याच मालिकेतील प्रमुख अभिनेता अजिंक्य देखील आता चित्रपटाच्या नवीन प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. त्यामुळे ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. नुकतेच मालिकेच्या सर्व कलाकारांनी एकत्र येऊन हा क्षण साजरा केलेला पाहायला मिळाला. या मालिकेच्या जागी तू चाल पुढं ही नवी मालिका प्रसारित करण्यात येणार आहे. दीपा परब या मालिकेत मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार असून धनश्री काडगावकर, वैष्णवी कल्याणकर, देवेंद्र दोडके, अन्नपूर्णा विठ्ठल ही कलाकार मंडळी महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.येणारी हि नवीन मालिका प्रेक्षकाना नक्की आवडेल यात शंका नाही.