जरा हटके

नवऱ्यासाठी निर्जळी उपवास करण्यापेक्षा हेमांगी कवीची खरमरीत पोस्ट

जन्मोजन्मी हाच नवरा मिळावा म्हणून आज महाराष्ट्रभर वटपौर्णिमा सण मोठ्या उत्साहात साजरा केलेला पाहायला मिळाला. महिलांसोबतच पुण्यातील काही पुरुष मंडळींनी देखील वडाच्या झाडाची पूजा करून सात फेरे मारून जनोजन्मी हीच पत्नी लाभावी असादेखील आगळावेगळा उपक्रम राबविले. मराठी सेलिब्रिटी विश्वात देखील आजचा सण मोठ्या थाटात संपन्न झाला. अशातच हेमांगी कवीने एक खरमरीत पोस्ट लिहून आपल्या चाहत्यांचे लक्ष्य वेधून घेतलेले पाहायला मिळते आहे. आजच्या दिवशी उपवास करून वडाची पूजा करणे अपेक्षित असते.

actress hemangi kavi in saree
actress hemangi kavi in saree

मात्र हेमांगी कवीने हटके अंदाजात आपली वटपौर्णिमा साजरी केलेली पाहायला मिळत आहे. हेमांगी कवी सोशल मीडियावर नेहमीच काही ना काहीतरी वक्तव्य करत असते तिचे म्हणणे अनेकांना पटते तर अनेक जण तिच्या मताची खिल्ली उडवताना पाहायला मिळाली. मात्र वटपौर्णिमा विशेष तिची ही खरमरीत पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. साता जन्माच्या गोष्टी! असे कॅप्शन देऊन हेमांगी वटपौर्णिमेच्या व्रताबद्दल म्हणते की, ‘साता जन्माच्या गोष्टी! नवऱ्यासाठी निर्जळी उपवास करण्यापेक्षा त्याच्या नाकी नऊ न आणणं हे जास्त महत्वाचं आणि फलदायी व्रत आहे कुठल्याही बायकोसाठी! वडाची फांदी तोडून घरी आणून पुजण्यापेक्षा किंवा वडाच्या झाडाला दोरा गुंडाळण्यापेक्षा आपल्या नवऱ्याच्या नावाचं झाड प्रत्येक वर्षी लावलं तर फक्त त्याचंच नाही तर आपलं ही आयुष्य वाढेल कदाचित! काय? ‘ हेमांगीच्या या मातीचं अनेकांनी कौतुक केलं आहे तर काहींनी मिश्किल प्रतिक्रिया दिलेल्या पाहायला मिळत आहेत.

hemangi kavi on vatpornima
hemangi kavi on vatpornima

हेमांगीने या खरमरीत पोस्ट सोबतच तळ टीप दिली आहे ज्यात ती अगोदरच आपल्या ट्रोलर्सना उत्तर देऊन मोकळी झाली आहे. तळ टीप देत हेमांगी म्हणते की, ‘यात कुणाच्या ही धार्मिक भावना दुखवायच्या नाहीयेत. उपवास करायची ज्याची त्याची इच्छा आणि श्रद्धा! तरीही त्यातून जर कुणी “म्याडम तुमी उपास धरला काय” विचाणाऱ्यांना वाळलेला फणस मिळो!’ ह्या पोस्टमुळे आपण कदाचित ट्रोल होऊ शकतो याची खबरदारी तिने या तळ टीपमधून अगोदरच घेतलेली पाहायला मिळत आहे. हेमांगीच्या अनेक पोस्ट या पूर्वी देखील व्हायरल झाल्या आहेत अनेकांना तीच रोखठोक बोलणं पटत तर अनेक लोक तिच्या पोस्टवर वाद घालताना देखील पाहायला मिळतात असो अभिनेत्री हेमांगीची हि पोस्ट देखील अनेक नेटकऱ्यांना नक्कीच आवडेल यात शंका नाही .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button