Breaking News
Home / आरोग्य / अनेक जणांनी फक्त दिसण्यावरुन कामं नाकारली केवळ रंगावरून… प्रसिद्ध मराठी अभिनेत्री काय म्हणते पहा

अनेक जणांनी फक्त दिसण्यावरुन कामं नाकारली केवळ रंगावरून… प्रसिद्ध मराठी अभिनेत्री काय म्हणते पहा

“अनेक जणांनी फक्त दिसण्यावरुन कामं नाकारली”…दिसण्यावरून आत्मविश्वास गमलेल्यांसाठी मराठी अभिनेत्रीची पोस्ट केवळ रंगावरून एखादी व्यक्ती सुंदर आहे की कुरूप हे ठरवले जाते. जर व्यक्तीच्या आंतर मनातून डोकावून पाहिले तर कुठलीच व्यक्ती कुरूप नसते हे प्रकर्षाने जाणवते. ही जाण प्रत्येकाकडेच आहे असे नाही, म्हणूनच सुंदर आणि कुरूप यांच्या परिभाषा निर्माण झालेल्या पाहायला मिळतात. एखादी स्त्री केवळ नाकी डोळी सरस असली तरीही तिला तिच्या सावळेपणावरून सहज हिनवले जाते. अशीच एक भावना अभिनेत्री हेमांगी कवी हिने व्यक्त केली आहे. आजवर अनेक चित्रपट, मालिका तसेच नाटकांतून हेनांगीने नेहमीच सरस भूमिका साकारलेल्या पाहायला मिळाल्या आहेत. या प्रवासात मात्र बरेच चांगले वाईट अनुभव तिच्या वाट्याला आले. आपल्या रंगावरून आणि दिसण्यावरूनही आपल्याला कामे देत नव्हतं हे तिने तिच्या पोस्टमधून सांगितले आहे पाहुयात त्याबाबत ती अधिक काय म्हणाली ते…

famous actress hemangi kavi
famous actress hemangi kavi

मी या industry त काम करताना चेहऱ्यावर make up लावून माझे weak points झाकून ‘तथा कथित सुंदर’ दिसण्याचा खूप प्रयत्न केला! त्यात काही अंशी सफल ही झाले. कृत्रिम रित्या सुंदर दिसण्याच्या नादात अनेक जण आपला खरा चेहरा हरवून बसतात पण मला उलट माझा खरा चेहरा गवसला… त्यातलं सौंदर्य दिसू- कळू लागलं! मी make up केल्याने छान दिसते आणि त्याशिवाय ही छान दिसते हे लक्षात आलं! थोडं उशिराच! देर से आए दुरुस्त आए! मला माझ्या दिसण्याचा न्यूनगंड कधीच नव्हता त्यामुळे माझा आत्मविश्वास कुठे कमी पडला नाही पण हो आपण conventionally सुंदर नाही हे कुठेतरी मनात होतं, बिंबवलं गेलं होतं! ते मी छान स्वीकारलं ही होतं. अनेक जणांनी फक्त दिसण्यावरून कामं नाकारली. अपमान केले पण या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करत मी माझं कामं करत राहिले! दरम्यान काही सिनेमे केले, नाटके केली ज्यात मी विना make up प्रमुख भूमिका केल्या आणि आपण ही सुंदर दिसू शकतो किंवा आहोत याची हळू हळू शाश्वती मिळत गेली आणि आता तर मी माझं दिसणं enjoy करू लागलेय! जे आधी कधी केलं नाही असं स्वतःवर प्रेम करू लागलेय And that’s the best part! काही जण मला आवर्जून सांगतात की तुम्ही विना make up च्या ही छानच दिसता! तुझा रंग छान आहे वगैरे वगैरे! Thank u so much पण काही जण “ही make up शिवाय कशी दिसते”, “शी ही किती काळी आहे”, “तुम्ही make up मधेच छान दिसता” म्हणतात तेव्हा मी त्यांना ‘शाही फाटा’ देते! अपुन सुंदर है! Beautiful है! त. टी. : मी ही post लिहून कुठलंच victim card वगैरे खेळून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत नाहीए उलट ज्यांना असा आपल्या दिसण्यावरून काही न्यूनगंड असेल, आत्मविश्वास गमावून बसले असतील त्यांच्यासाठी ही post आहे!

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *