Breaking News
Home / जरा हटके / मराठी अभिनेत्री गौतमी आणि मृण्मयी देशपांडे या बहिणींनी सुरू केला हटके व्यवसाय

मराठी अभिनेत्री गौतमी आणि मृण्मयी देशपांडे या बहिणींनी सुरू केला हटके व्यवसाय

मराठी सृष्टीतील कलाकार मंडळी अभिनय क्षेत्रात स्थिरस्थावर झाल्यावर जोडव्यावसायाकडे वळतात. मग कपड्यांचा, साड्यांचा ब्रँड असो, युट्युब चॅनल असो, हॉटेल व्यवसाय असो किंवा आर्टिफिशिअल ज्वेलरीचा व्यवसाय या क्षेत्रातही मराठी कलाकार मंडळी तग धरून आहेत. माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील आनंद काळे, प्रिया बेर्डे, सुहृद वर्डेकर, शंतनू मोघे, अविष्कार दारव्हेकर यांनी हॉटेल व्यवसायाला सुरुवात केली आणि आता ते या व्यवसायात स्थिरस्थावर झालेले पाहायला मिळत आहेत. तर तेजस्विनी पंडित, अभिज्ञा भावे यांचा तेजाज्ञा हा कपड्यांचा ब्रँड, अथर्व चव्हानचा गेल्या सात वर्षांपासून सुरू असलेला प्रतिपदा क्लॉथींग ब्रँड नावारूपाला आला आहे. अभिनय आणि व्यवसाय अशा दोन्ही माध्यमातून ही कलाकार मंडळी बिनधास्तपणे वावरताना पाहायला मिळाली आहेत.

gautami deshpande new business
gautami deshpande new business

आता याच यादीत अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आणि तिची धाकटी बहीण गौतमी देशपांडे यांचेही नाव आवर्जून घ्यावे लागणार आहे. या दोघी बहिणींनी हटके व्यवसायात उडी घेतलेली पाहायला मिळत आहे. या दोघी बहिणींचे मजामस्ती करतानाचा अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. मात्र काही दिवसांपूर्वी या दोघींनी व्यवसाय क्षेत्रात उतरत असल्याची हटके अंदाजात एक अनौसमेंट केली. मृण्मयी, तिचा नवरा स्वप्नील आणि गौतमी या तिघांनी साबणाचा व्यवसाय करण्याचे ठरवले. स्वप्नील राव हा एमबीए आहे वेगवेगळ्या कंपन्यांसाठी त्याने सीईओ पदावर काम केले आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून तो एका वेगळ्या व्यवसायाच्या शोधात होता. मृण्मयीच्या साथीने त्याने नैसर्गिक शेतीकडे आपले लक्ष्य वळवले. यातूनच साबणाची निर्मिती करण्याचे त्यांनी ठरवले. पण हो हे साबण साधेसुधे साबण नसून अगदी नैसर्गिक पद्धतीने बनवण्यावर त्यांनी अधिक भर दिला. ‘Neil and momo’ असे व्यवसायाला हटके नाव त्यांनी दिले आहे. याबद्दल ते म्हणतात “स्वप्नील राव (नील) आणि मृण्मयी देशपांडे राव (मोमो) यांनी कंपनीची स्थापना केल्यापासून नील आणि मोमोने खूप लांब पल्ला गाठला आहे. आम्ही मुंबई सोडली आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेल्या महाबळेश्वरमधील आमच्या पर्माकल्चर होमस्टेडमध्ये स्थायिक झालो. कार्बन पॉझिटिव्ह, शून्य कचरा जीवन जगण्याचा निर्धार करून, आम्ही आमच्या दैनंदिन जीवनात छोटे बदल करण्यास सुरुवात केली. आम्ही 100% सेंद्रिय शेतमालापासून बनवलेले घरगुती साबण, शॅम्पू, टूथपेस्ट आणि डिओडोरंट्स वापरण्यास सुरुवात केली.”

gautami deshpande actress
gautami deshpande actress

नील अँड मोमो फार्म टू बार साबण हे सर्व साबण नैतिक पद्धतीने तयार केलेल्या सेंद्रिय कच्च्या मालापासून बनवले जातात. हे साबण लहान तुकड्यांमध्ये वास्तविक लोकांद्वारे बनवले जातात जे तुमच्या त्वचेची आणि पर्यावरणाची काळजी घेतात. १०० टक्के सेंद्रिय पद्धतीने बनवण्यात आल्याने त्यासाठी कोणत्याही प्राण्यांच्या चाचणीची आवश्यकता नाही असे त्यांनी म्हटले आहे. नील अँड मोमो या साबणाच्या वेगवेगळ्या व्हरायटी तुम्हाला त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर पाहायला मिळतील. गुलाब, मध, मुलतानी माती, कोको, कोळसा, गवती चहा, अश्वगंधा, अक्रोड यांचा वापर करून हे साबण तयार करण्यात आले असल्याने त्वचेला कुठलीही इजा होणार नाही याची त्यांनी काळजी घेतली आहे. स्वतः मृण्मयी आणि गौतमीने या साबणाची जाहिरात देखील केली आहे. त्यांच्या या नील अँड मोमो या साबणाला सोशल मीडियावर चांगली मागणी सुरू झाली आहे. या हटके व्यवसायासाठी मृण्मयी, स्वप्नील आणि गौतमी या तिघांनाही खुप खुप शुभेच्छा.

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *