हिंदी बिग बॉसच्या तुलनेत ह्यावेळी मराठी बिग बॉसने चांगली प्रसिद्धी मिळवली आहे. त्यामुळे टीआरपीच्या रेसमध्ये पुढे येण्यासाठी हिंदी बिग बॉसने वेगवेगळ्या सदस्यांना वाईल्ड कार्ड एन्ट्री दिली आहे. हिंदी बिग बॉसचा १५ सिजन संपायला आता काहीच आठवडे शिल्लक राहिले आहेत त्यात राखी सावंतने पहिला कंटेस्ट म्हणून फायनलमध्ये प्रवेश केला आहे. राखी सावंत प्रमाणे बिग बॉसच्या घरात अभिजित बिचुकले यांनी देखील वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतली होती. इतके दिवस बिग बॉसच्या घरात राहून घरातील सदस्यांसोबत त्यांचं आसन जुळू लागलं आहे.

सगळे जण त्यांना ‘दादा’ म्हणूनच हाक मारत असतात. देवोलीना हिच्यासोबतही त्यांचं छान बॉंडिंग जुळून आलं आहे. मात्र एका मागणीमुळे बिचुकले अडचणीत सापडलेले पाहायला मिळत आहेत. बिग बॉसच्या घरात सदस्यांना एक टास्क दिला होता. म्युजियममधल्या काही वस्तू त्यांना चोरायच्या होत्या. अभिजित बिचुकले टास्क खेळत असताना म्युजियम मधल्या वस्तू मिळवतात आणि लपवून ठेवतात त्यावर बिचुकले म्हणतात की मेरे पास बहुत सारे आयटम है…तेरे लिये कूछ भी कर जाऊंगा…असे म्हणून ते देवोलीनाचा गाल ओढतात. त्यानंतर अभिजित बिचुकले आपल्या गालाला बोट लावून देवोलीनाला ‘ये कब करेगी तू?…’ असे म्हणून kiss मागतात. त्यावर देवोलीना प्रचंड संतापते आणि ‘आपको कितनी बार वॉर्निंग दि की आप लाईन क्रॉस मत करो, अगर मेरी अच्छाई का आप फायदा उठओगे तो मुझसे बुरा कोई नहीं होगा’…असं ओरडून बोलते. बिचुकले यांनी असं खरंच म्हटलं आहे का यावरून राखी सावंत त्यांना जाब विचारते एवढेच नाही घरातील सर्वच सदस्य बिचुकलेना ह्या कृत्याचा जाब विचारतात.

त्यावेळी मी फक्त गंमत केली होती अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तिथेच तेजस्वी प्रकाश बसलेली असते त्यावेळी बिचुकलेचे हे वागणे खरंच आहे का असा प्रश्न विचारते. बिचुकलेंच्या जवळ जाऊन ती त्यांना म्हणते की, मी तुमच्या खूप जवळ आहे आणि मी तुम्हाला कानाखाली मारू शकते…त्यामुळे हिंदी बिग बॉसच्या घरात आज तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळणार आहे. दरम्यान ह्या सर्व प्रकरणावर अभिजित बिचुकले यांनी सदस्यांना स्पष्टीकरण दिलं होतं की मी हे सगळं गंमत म्हणून केलं होतं ह्याचा वेगळा अर्थ कोणीही घेऊ नये… अभिजित बिचुकले यांनी केलेले कृत्यावर बिग बॉसच्या घरातील सदस्य त्यांना जाब विचारत आहेत आणि देवोलीनालाच्या बाजूने मतं मांडत आहेत. ह्या सर्व प्रकारणावर सलमान खानची प्रतिक्रिया काय असेल याची उत्सुकता शनिवारच्या भागात पाहायला मिळेल.