अभिनेता अंकुश चौधरी सोबत जत्रा चित्रपटाच्या सुरवातीला प्रकाशित झालेल्या “ये गो ये ये मैना” या गाण्यातून पदार्पण केलेली अभिनेत्री दीपाली सय्यद हि तिच्या डान्समुळे चांगलीच प्रकाश झोतात आली. त्यानंतर तिने कधी मागे वळून पहिले नाही. लाडी गोडी, जाऊ तिथे खाऊ, बोला अलख निरंजन, चष्मेबहाद्दर, मास्तर एके मास्तर, मुंबईचा डबेवाला अशा विविध चित्रपटातून अभिनेत्री दीपाली भोसले सय्यद हिने महत्वाच्या भूमिका बजावल्या आहेत. एक उत्तम अभिनेत्री सोबतच एक उत्कृष्ट नृत्यांगना म्हणूनही तिची ख्याती आहे. अभिनेत्री मानसी नाईक आणि दीपाली सय्यद यांची मैत्री तर सर्वानाच परिचयाची आहे.

आज दीपाली खूप वर्षानंतर सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेत येत आहे. सध्या ती राजकारणात सक्रिय असली तरी तिने आपली नृत्याची आवड आजही जपलेली पाहायला मिळते आहे. दीपाली सोशिअल मीडियावर नेहमीच सक्रिय असलेली पाहायला मिळते. तिने केलेले सामाजिक कार्य असो किंवा डान्स ती मनसोक्तपणे तिच्या चाहत्यांसोबत घडामोडी शेअर करताना पाहायला मिळते. नुकताच तुने एक डान्स चा व्हिडिओ शेअर केला आहे तो व्हिडिओ पाहून तिच्या चाहत्यांना तिने आश्चर्याचा धक्काच दिला आहे. नुकतेच दिपालीने आपला मुलगा अली सय्यद याच्या सोबत “तू तू है वही…दिल ने जिसे….” या हिंदी गाण्यावर ठेका धरतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. जागतिक नृत्य दिनाचे औचित्य साधून तिने आपल्या मुलासोबत डान्स करून चाहत्यांची माने जिंकून घेतली आहेत. हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी देखील कौतुक करत असताना ‘दिपालीला एवढा मोठा मुलगा आहे’ हे पाहून आश्चर्य व्यक्त केले आहे. तर काहींनी माय लेकाची जोडी पाहून दिपालीला ‘संतूर मॉम’ असे संबोधले आहे. २००८ साली दीपाली बॉबी खान सोबत विवाहबद्ध झाली होती. त्यानंतर चित्रपटातून ब्रेक घेऊन राजकारणात तिने प्रवेश केला.

अहमदनगर जिल्ह्यात तिने निवडणूक देखील लढली आहे. दीपाली इन्स्टाग्रामवर चांगलीच सक्रिय असून ती नेहमी आपले फोटो आणि डान्सचे व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते परंतु पहिल्यांदाच तिने आपल्या मुलाला देखील चाहत्यांसमोर आणल्याने ती यावेळी चांगलीच चर्चेत आली आहे. दोघांनी केलेल्या या नृत्याच्या व्हिडिओला सोशल मीडियावर देखील चांगली पसंती मिळाली आहे. आई आणि मुलाच्या नात्यातली जवळीक ह्या व्हिडिओतून पाहायला मिळते मुलगा अली सोबत नृत्य करताना अभिनेत्री खूप आनंदी झालेली पाहायला मिळतेय. ह्यापूर्वी मुलगा अली हा डान्स रिऍलिटी शोमध्ये आलेला पाहायला मिळाला तेंव्हा देखील हा अभिनेत्री दीपाली सय्यद ह्यांचा मुलगा आहे असं कोणालाच पटत नव्हतं. खरोखरच हि संतूर गर्ल आहे अशी अनेक प्रेक्षकांनी तिची स्तुती केलेली पाहायला मिळाली. चला तर पाहुयात अभिनेत्री दीपाली सय्यद आणि मुलगा अली ह्यांचा “तू तू है वही…दिल ने जिसे….” या हिंदी गाण्यावर ठेका धरलेला डान्सचा व्हिडिओ …
View this post on Instagram