Breaking News
Home / जरा हटके / खाजगी रुग्णालयात सर्जरी केलेल्या अभिनेत्रीचे निधन आई वडिलांच्या डॉक्टरांच्या निष्काळजीपणावर लावले आरोप

खाजगी रुग्णालयात सर्जरी केलेल्या अभिनेत्रीचे निधन आई वडिलांच्या डॉक्टरांच्या निष्काळजीपणावर लावले आरोप

अभिनय क्षेत्रात यायचे म्हटले की कलाकार अधिक सुंदर दिसण्यासाठी वेगवेगळ्या सर्जरी करण्याचा पर्याय स्वीकारतात. मात्र ओठांची प्लॅस्टिक सर्जरी करणे कित्येकदा अभिनेत्रींना महागात पडलेले पाहायला मिळाले आहे. अशीच एक फॅट सर्जरी करून कन्नड टीव्ही अभिनेत्रीला आपला जीव गमवावा लागला आहे. ही कन्नड अभिनेत्री चेतना राज. वयाच्या अवघ्या२१ व्या वर्षी चेतना राज हिच्या अकाली निधनाने मालिका सृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे. चेतना राज हिने गीता, दोरेसानी या कन्नड मालिकांमधून अभिनय साकारला होता.

actress chetana raj
actress chetana raj

काही दिवसांपूर्वीच तिने खाजगी रुग्णालयात फॅट सर्जरी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु याबाबत तिने आपल्या आई वडिलांना कुठलीच कल्पना दिलेली नव्हती. आपल्या मैत्रिणींसोबत चेतना डॉ शेट्टी कॉस्मेटिक हॉस्पिटलमध्ये फॅट सर्जरी करण्यासाठी गेली होती. सर्जरीमुळे तिच्या फुफ्फुसांमध्ये पाणी शीरले होते यामुळे चेतनाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला होता. हॉस्पिटलमध्ये आयसीयूची सुविधा उपलब्ध नसल्या कारणाने तिला मंजुनाथनगर येथील काडे हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले होत्व. परंतु तिला जेव्हा हॉस्पिटलमध्ये आणले त्यावेळी ती मृत झाली होती असे डॉक्टरांनी सांगितले. आता चेतनाच्या आई वडिलांनी डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा आरोप लावला आहे त्यांच्याचमुळे आमच्या मुलीचा नाहक बळी गेला आहे . १६ मे २०२२ रोजी सकाळी ९.३० वाजता चेतनाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले होते याची आम्हाला कुठलीच कल्पना देण्यात आली नव्हती असा आरोप त्यांनी डॉक्टरांवर लावला आहे. दरम्यान काडे हॉस्पिटलचे डॉक्टर संदीप व्ही यांनी बंगळुरू येथील बसवेश्वरनगर पोलिसस्टेशनमध्ये जाऊन याबाबत तक्रार दाखल केली आहे.

chetana raj actress
chetana raj actress

त्यांनी असा दावा केला आहे की चेतनाला आमच्या दवाखान्यात दाखल करण्यागोदरच तिचा मृत्यू झाला होता. चेतनाला ५.३० वाजता आमच्या हॉस्पिटलमध्ये आणले होते त्यावेळी एक डॉक्टर तिच्यासोबत आले होते त्यांनी आमच्या हॉस्पिटलमध्ये येऊन सिक्युरिटीला धमकावण्यास सुरुवात केली आणि हॉस्पिटलचे कुठलेही नियम न पळता त्यांनी चेतनाला आयसीयूमध्ये ऍडमिट करण्यास सांगितले. मात्र तीला जेव्हा आमच्या हॉस्पिटलमध्ये आणले होते त्यावेळी तिची हालचाल सामान्य वाटत नव्हती. चेतनाचे शव आता बंगळुरू येथे ठेवण्यात आले आहे. शवविच्छेदनासाठी तिचा मृतदेह रमय्या रुग्णालयात हलविण्यात येईल असे सांगितले जाते. शवविच्छेदनानंतर तपासात जे निष्पन्न होईल त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *