बॉलीवूडमध्ये एकेकाळी अभिनेत्याचं वर्चस्व होतं पण तरी देखील हेमा मालिनी, रेखा, श्रीदेवी ह्याचं बरोबर आणखीन एक नाव होत ते म्हणजे अभिनेत्री बिंदू ह्यांचं. बॉलीवूडमध्ये ७० च्या दशकापासून ९० च्या दशकापर्यंत आपल्या अदाकारीने वेगवेगळ्या भूमिका रंगवून आपलं नाव अजरामर करणाऱ्या बिंदू हिने २००० नंतर सिनेसृष्टीतून काढता पाया घेतला. अमिताभपासून शाहरुख अक्षय पर्यंत सर्वच कलाकारासोबत तिने काम केलं. जवळपास २०० हुन अधिक चित्रपटात तिने अष्टपैलू अभिनेत्री आणि आजी डान्सर अश्या अनेक भूमिका साकारल्या.

वयाच्या अवघ्या ११ वर्षापासूनच त्यांनी चित्रपटांत काम करायला सुरवात केली. “अनपढ” हा बिंदू यांनी साकारलेला पहिला चित्रपट आहे. पण इक्तेफाक आणि दोरास्ते या चित्रपटांतील भूमिकांमुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या. अमिताभ, गोविंदा, मिथुन, अक्षय कुमार ह्यांसारख्या प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत कधी अभिनेत्री कधी आई तर कधी खडूस सासू म्हणून त्यांनी अनेक रोल निभावले. अभिनयासोबत एक उत्तम डान्सर म्हणूनही त्यांनी नावलौकिक कमावले. अगदी वयाच्या १६ व्या वर्षीच त्यांनी आपल्या घरा जवळ राहत असलेल्या चंपकलाल ज़वेरी यांच्यासोबत प्रेम विवाह केला. चंपकलाल ज़वेरी आणि बिंदू ज़वेरी यांच्या नावे मुबंईत ज़वेरी हॉर्स स्टॅंड फार्म आहे. पुणे, मुंबई, बंगलोर, हैद्राबाद, कोलकत्ता, म्हैसूर, उटी ह्याठिकाणी घोड्यांच्या शर्यतीत त्यांचे घोडे धावतात. ह्या व्यतिरिक्त इम्पोर्ट अँड एक्स्पोर्ट, ऍग्रीकलचर फार्म, ऍग्रीकलचर प्रॉडक्ट्स, पॉलिटरी फार्म, मिल्क प्रोड्युस अँड डेअरी प्रॉडक्ट फर्म्स असे अनेक बिजनेस हे करतात. पण त्यांचा प्रमुख धंदा हॉर्स ब्रीडिंग आणि रेसिंग हाच असल्याचा ते मानतात.

ह्या कंपन्यांच्या शेअर्स ची किंमत शेअर मार्केटमध्ये लाखो कोट्यवधींच्या घरात आहे. पुणे मुंबई यांच्या (रॉयल वेस्टर्न टुर्फ क्लब) च्या बिंदू आणि चंपकलाल ज़वेरी हे सदस्य असल्यामुळे घोड्यांच्या मोठमोठाल्या शर्यतीत आणि डर्बी च्या वेळी हे हजेरी लावतात. यामुळे बिंदू यांच्या संपत्तीपुढे सलमान शाहरुख सारख्या बड्या हस्तींची संपत्तीही चिल्लर आहे. पुण्याच्या कोरेगाव पार्क मध्ये त्यांचं आलिशान घर आहे जे शाहरुखच्या मन्नत पेक्षाही खूप मोठं आणि आलिशान आहे. चंपकलाल ज़वेरी आणि बिंदू याना संतान नाही. त्यामुळे पुण्यात अनेक ठिकाणी बालश्रमानं बिंदू ज़वेरी नेहमी मदत करताना पाहायला मिळतात. आपण नेहमीच अभिनेत्यांच्या संपत्ती बद्दल वाचतो ऐकतो पण बिंदू ह्यांची संपत्ती पाहून अनेकांचे डोळे चक्रावले असतील हेही तितकंच खरं.