
सध्या मराठी सृष्टीत साखरपुड्याचे सोहळे साजरे होताना दिसत आहेत मात्र मराठी सृष्टीतील एका प्रसिद्ध अभिनेत्रीने ब्रेकअपची घोषणा केली आहे. ऑक्टोबर २०२२ मध्ये अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिने मेकअप आर्टिस्ट असलेल्या विजय पलांडे सोबत साखरपुडा केला होता. त्यांच्या साखरपुड्याला हृतिक रोशन याने हजेरी लावली होती. विजय पलांडे हा हृतिक रोशनचा पर्सनल मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करतो त्यामुळे त्या साखरपुड्यात हृतिकने आवर्जून हजेरी लावली होती. पण साखरपुड्यानंतर आता जवळपास दीड वर्षाने या दोघांनी वेगळे झाल्याची घोषणा केली आहे..भाग्यश्री मोटे हिने याबाबत एक पोस्ट जाहीर केली आहे. त्यात तिने आमच्यात आता काहीही नातं नाही असे म्हटले आहे.

या ब्रेकअपबद्दल ती म्हणते की, ” नमस्कार, एकमेकासोबत राहण्याचा प्रदीर्घ अनुभव घेतल्यानंतर विजय आणि मी एका वैयक्तिक चांगल्या कारणांसाठी जोडीदार म्हणून आम्ही वेगळे होण्याचा निर्णय घेत आहोत! यापुढे नक्कीच आम्ही चांगले मित्र राहू! कृपया आमच्या या निर्णयाचा आदर करा! आभार” असे म्हणत भाग्यश्री मोटे हिने ब्रेकअप झाल्याचे जाहीर केले आहे. सोबतच विजय पलांडे सोबत असलेले काही वैयक्तिक फोटोही तिने सोशल मीडियावरून हटवले आहेत. साखरपुड्यानंतर भाग्यश्रीच्या आयुष्यात अनेक चढउतार आले. गेल्याच वर्षी तिच्या बहिणीचा अकस्मात मृत्यू झाल्याने तिला खूप मोठा धक्का सहन करावा लागला होता. बहीण भाऊजी यांचे काही दिवसातच निधन त्यांच्या दोन मुलांची जबाबदारी अशी तिच्यावर संकटं ओढावली होती.

पण खचून न जाता भाग्यश्री या सर्व गोष्टीला सामोरे जात होती. पण अशातच आता भाग्यश्रीने विजय सोबत ब्रेकअप झाल्याची बातमी जाहीर केली आहे त्यामुळे सध्या तिची मनस्थिती कशी असेल याची जाणीव तिच्या सहकलाकारांना आणि चाहत्यांना आहे. त्यामुळे तिने घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे सोबतच तिला या दुःखातून सावरण्यासाठी बळ दिले जात आहे. २०११ मध्ये शोधू कुठे या चित्रपटातून भाग्यश्रीने अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले होते. देवयानी, देवा श्री गणेशा अशा मालिकेतून ती महत्वपूर्ण भूमिकेत झळकली होती.