Breaking News
Home / जरा हटके / सरसेनापती हंबीरराव चित्रपटातील हा व्यक्ती आहे प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा

सरसेनापती हंबीरराव चित्रपटातील हा व्यक्ती आहे प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा

प्रवीण तरडे अभिनित आणि दिग्दर्शित सरसेनापती हंबीरराव हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. बॉलिवूड चित्रपटांना बगल देत आता मराठी चित्रपट चित्रपटगृहांमध्ये हाऊसफुल्ल गर्दी खेचून आणताना दिसत आहेत. हेच या मराठी चित्रपटांचे यश म्हणावे लागेल. कर्नाटकमध्ये या चित्रपटाचे स्वागत दुग्धाभिषेकाने करण्यात आले हे विशेष. पहिल्या दिवशी या चित्रपटाला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला यावेळी बॉक्सऑफिसवर २.६ कोटींची कमाई केली तर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी हा आकडा वाढलेला पाहायला मिळाला. सरसेनापती हंबीरराव या चित्रपटाला प्रदर्शित होऊन आज ५ दिवस होत आहेत मागील चार दिवसात या चित्रपटाने १०.५१ कोटींची रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे.

actor shubhankar ekbote
actor shubhankar ekbote

या चित्रपटाचे खरे यश म्हणजे त्यातील कलाकार आणि चित्रपटाची भव्यदिव्यता. धाकले धनी म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका गश्मीर महाजनीने चोख साकारलेली पाहायला मिळाली. तर प्रवीण तरडे, स्नेहल तरडे, रमेश परदेशी, उपेंद्र लिमये, श्रुती मराठे यांनी देखील आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. या चित्रपटात धनाजीचे पात्र शुभंकर एकबोटे याने निभावले आहे. प्रवीण तरडे दिग्दर्शित धर्मवीर या चित्रपटात देखील शुभंकर झळकला होता. शुभंकर हा मराठी सृष्टीतील दिवंगत अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांचा मुलगा आहे हे बहुतेकांना परिचयाचे नसावे. अश्विनी एकबोटे यांचे निधन मराठी सृष्टीला चटका लावून देणारे ठरले होते. पुण्यात भरत नाट्यमंदिर येथे नाट्य त्रिविधा या लाईव्ह कार्यक्रमात अश्विनी एकबोटे नृत्य सादर करत होत्या. चालू कार्यक्रमातच त्या मंचावर कोसळल्या. त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र यातच त्यांचे निधन झाले. २२ ऑक्टोबर २०१६ रोजी वयाच्या अवघ्या ४४ व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या जाण्याने मराठी सृष्टीतील तमाम कलाकारांनी हळहळ व्यक्त केली होती.

ashwini ekbote son subhankar ekbote
ashwini ekbote son subhankar ekbote

शुभंकरने आपल्या आईच्या पावलावर पाऊल टाकत मंत्र या मराठी चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पाऊल टाकले. धनश्री काडगावकर सोबत त्याने चिठ्ठी चित्रपटातून मध्यवर्ती भूमिका साकारली. सन मराठीवरील कन्यादान या मालिकेत तो राणा शेठच्या भूमिकेत झळकला.रफू या शॉर्टफिल्म सोबत शुभंकरने नाटकांमधून देखील काम केलं आहे. विराजस कुलकर्णीच्या थेटरऑन या नाट्यसंस्थेशी तो जोडला गेला आहे. या प्रवासात त्याला प्रवीण तरडेच्या धर्मवीर आणि सरसेनापती हंबीरराव अशा दोन चित्रपटात झळकण्याची संधी मिळाली. या चित्रपटांमुळे शुभंकर प्रकाशझोतात आला आहे. आणि आता ती अश्विनी एकबोटे यांचा मुलगा म्हणून सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवताना दिसत आहे. त्याच्या अभिनय क्षेत्रातील यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *