
रात्रीस खेळ चाले ३ या मालिकेतील शेवंताची भूमिका रंगवणाऱ्या अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने मालिका सोडली असल्याने मालिकेच्या प्रेक्षकांना धक्का बसला आहे. रात्रीस खेळ चाले २ शेवंतामुळे सुपरहिट झालेल्या मालिकेच्या तिसऱ्या सिजनमध्ये देखील अपूर्वा शेवंताची भूमिका निभावताना दिसली मात्र एका कारणामुळे तिने ही मालिका सोडली असल्याचे सांगितले आहे. अपूर्वाने याबाबत सांगितलं की, शेवंताच्या भूमिकेसाठी मी १० किलो वजन वाढवलं होतं वजन वाढवल्यानंतर ज्या काही निगेटिव्ह कमेंट्स आल्या त्या मी फेस करत आले.

परंतु आता सेटवर काम करत असताना अगदीच नवख्या आणि काही जेष्ठ कलाकारांनी विनाकारण या वाढलेल्या वजनावर माझे विडंबन केले उघडपणे माझी खिल्ली उडवली गेली त्यात काही कमेंट्स तर मला जिव्हारी लागतील अशा जाणीवपूर्वक वारंवार केल्या गेल्या. त्याबद्दल वरिष्ठांनी कारवाई केल्यानंतरही संबंधित कलाकारांनी साधी दिलगिरी सुद्धा व्यक्त केली नाही. तुम्हाला माहीतच आहे की रात्रीस खेळ चाले शूटिंग सावंतवाडीत चालू आहे. मी मुंबईहून १२ तासांचा ट्रेनन प्रवास करून जात होते मला शूटिंगकरता बोलावल्यानंतर फक्त एकच दिवस शूट करून नंतर ३-४ दिवस काहीच शूट केलं जातं नव्हतं अस महिन्याभरात केवळ ६ ते ७ दिवसच काम लागत होतं आणि त्याकरता मला वारंवार प्रवास करावा लागत होता. त्यात माझा अमूल्य वेळ संपूर्ण महिनाभर वाया जात होता. प्रोडक्शन हाऊस कडून मला सांगण्यात आलं की तिसऱ्या सिजनसाठी तुमचे ५ ते६ दिवस लागणार आहेत तेव्हा मी नकार दिला पण अजून एक मालिका देतो अस आश्वासन दिलं गेलं परंतु ५ ते ६ महिने झाले तरी अद्याप हे आश्वासन पाळलं नाही त्यामुळे माझं आर्थिक नुकसान झालं.

असाच प्रकार तुझं माझं जमतंय या मालिकेवेळी घडला त्या मालिकेचा अद्याप शेवटचा चेक मला मिळाला नाही . मी अत्यंत प्रामाणिकपणे एकनिष्ठ राहून काम केलं परंतु माझ्या कष्टाचा मोबदला मिळत नसेल नवख्या काळकरांकडून अपमानास्पद वागणूक मिळत असेल तर आशा ठिकाणी काम करणं माझ्या तत्वात बसत नाही. त्यामुळे मी ही मालिका सोडत आहे असे अपूर्वा म्हणते… शेवंताच्या भूमिकेने लोकप्रियता मिळवून दिली त्यामुळे ही भूमिका सोडताना खूपच वाईट वाटतंय असंही ती म्हणाली. प्रेक्षकांचे प्रेम माझ्यावर असेच राहो अशी आशा तिने व्यक्त केली आहे. दरम्यान अपूर्वाने मालिका सोडली असल्याने शेवंताची भूमिका आता अभिनेत्री “कृतिका तुळसकर ” निभावणार आहे. कृतिका तुळसकर हिने बबन, विजेता, पाशबंध या चित्रपटातून काम केलं आहे. मालिकेत अपूर्वाने साकारलेली शेवंता प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली आहे त्यामुळे दुसऱ्या अभिनेत्रीला ह्या भूमिकेत पाहताना तुलना केली जाणार हे नक्कीच…