Breaking News
Home / जरा हटके / माझ्यासमोर बोट दाखवून बोलायचं नाही बिग बॉसच्या घरात पहिल्याच दिवशी अपूर्वा नेमळेकरने दिली प्रसादला तंबी

माझ्यासमोर बोट दाखवून बोलायचं नाही बिग बॉसच्या घरात पहिल्याच दिवशी अपूर्वा नेमळेकरने दिली प्रसादला तंबी

बिग बॉस शो आणि त्यात होणारे वाद हे समीकरण काही नवीन नाही. बिग बॉसच्या घरात मुक्कामाला येणारे सेलिब्रिटी स्पर्धक कधी एकमेकांच्या अतीजवळीकतेने चर्चेत येतात तर कधी कडाक्याच्या भांडणामुळे चर्चेत येतात. बिग बॉसच्या ४ थ्या पर्वाचं दार उघडताच पहिल्याच दिवशी दोन सदस्यांमध्ये जुंपलेल्या भांडणाने पुन्हा या समीकरणाला सुरूवात केली. अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर आणि अभिनेता प्रसाद जवादे यांच्यात झालेल्या भांडणाने बिग बॉसचा पहिला दिवस चांगलाच गाजला. बिग बॉसच्या चौथ्या पर्वाला २ ऑक्टोबरपासून सुरूवात झाली आहे. ऑल इज वेल असं म्हणत या शोचे होस्ट महेश मांजरेकर यांनी काहीतरी वेगळं पहायला मिळेल अशी हिंट दिली होती, पण पहिल्याच भागात अपूर्वा आणि प्रसाद यांच्यातील बाचाबाची पाहिल्यानंतर हे पर्वही स्पर्धकांच्या भांडणानेच गाजणार याचे संकेत मिळाले.

apoorva nemlekar and prasad
apoorva nemlekar and prasad

बिग बॉसच्या पहिल्या टास्कमध्येच १६ पैकी चार स्पर्धक अपात्र ठरले. या चार स्पर्धकांपैकी कुणाला बिग बॉसच्या घरात राहता येईल यासाठी स्पर्धकांकडून मतं मागवण्यात आली होती. यावरूनच अपूर्वा आणि प्रसाद आमनेसामने उभे राहिले. योगेश जाधवला अपूर्वाने मत दिले यावरून प्रसादने तिच्याशी वाद घातला. पुढे हे प्रकरण इतकं पुढं गेलं की अपूर्वाने प्रसादला चक्क तंबीच दिली. अपूर्वाने तिचं मत दिलेला योगेश हा शरीराने बलदंड आहे, पण मला स्ट्राँग स्पर्धकाशी खेळायला आवडेल असं म्हणून अपूर्वाने योगेशला पाठिंबा दिला. त्यावरून प्रसादने अपूर्वाचं मत आणि योगेशचं बलदंड शरीर याचा संबंध जोडल्याने वादाची ठिणगी पडली. अपूर्वा प्रसादला म्हणाली, हा काही कुस्तीचा खेळ नाही. शरीरसौष्ठव बघून नव्हे तर त्याचा आत्मविश्वास पाहून मी योगेशला मत दिलं. विशेष म्हणजे ज्या चार अपात्र स्पर्धकांचं नावं जाहीर करण्यात आली आहेत त्यामध्ये प्रसादचंही नाव आहे. त्यामुळेच प्रसादला अपूर्वाचं मत मिळालं नसल्याचा राग मनात धरून प्रसादने अपूर्वावर राग काढल्याचं बोललं जात आहे. तर राग अनावर झालेल्या अपूर्वानेही, मी इथे कुणाची मनं जपायला आलेली नाही असं म्हणत प्रसादला सुनावलं.

apoorva nemlekar in bigboss marathi
apoorva nemlekar in bigboss marathi

बरं हा सगळा सीन सुरू असताना प्रसादने अपूर्वाकडे बोट करून वाद घालायला सुरूवात केल्याने अपूर्वा भडकली. माझ्यासमोर बोट करून बोलायचं नाही असं म्हणत तिने प्रसादला तंबी केली. यंदा जरा वेगळी शाळा घेऊ असं म्हणत महेश मांजरेकर यांनी प्रोमोमध्ये काहीतरी नवीन पहायला मिळेल अशी आशा दाखवली होती. पण आता पहिल्याच दिवशी अपूर्वा आणि प्रसादमधील वादाने बिग बॉसच्या घरातील पुढचे ९८ दिवस कसे असतील याची प्रेक्षकांना कल्पना आली आहे. पण बिगबॉस म्हटलं कि एकमेकांवर शाब्दिक प्रहार होणं ह्यात काही नवीन नाही. प्रेक्षकांना पण नेहमी पुढे काय होणार हे पाहण्याची उत्सुकता लागून राहण्याकरता नेहमीच हिंदी असो वा मराठी बिगबॉसच्या घरात असे डावपेच जाणून बुजून खेळले जातात जेणेकरून प्रेक्षक वर्ग कार्यक्रमात टिकून राहील आणि चर्चा देखील होईल. असो बिगबॉसच्या स्पर्धकांना हा बिगबॉसचा नवा सीजन चांगला जावो हीच सदिच्छा…

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *