दुबईमध्ये सध्या सुरु असलेल्या टी २० विश्वकपमध्ये भारताने खूपच निराशाजनक खेळ खेळला आहे. भारतातील आयपीएल सामने देखील दुबई येथेच खेळले गेले होते. त्यामुळे दुबईतील ग्राउंडवर भारतीय संघाचा चांगलाच सराव देखील झाला असल्याचं बोललं गेले. भारत २०२१ टी २० विश्वकपचा प्रमुख दावेदार होता पण पाकिस्तान आणि न्यूझीलंड ह्या दोन्ही संघाकडून मोठ्या मोठ्या फरकाने आपली हार झाली. अजूनही भारताला टिकून राहण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे. पण आता आपला संघ या खेळात टिकून राहण्याच्या आशा आता पुसटच दिसतायेत.

काही दिवसांपूर्वी म्हणजेच ३१ ऑक्टोबर रोजी झालेल्या हैलोवीन च्या दिवशी क्रिकेटर इशान किशन, हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टेनकोविक मुलगा अगस्त्य ह्यांच्या सोबत रोहित शर्मा आणि त्याची पत्नी रितिका सचदेव व मुलगी समायरा पाहायला मिळाल्या. ह्याच्या सोबतच आर अश्विन ह्याच्या आध्या आणि अखिरा ह्या देखील या हैलोवीन सोहळ्यात सामील झाल्या होत्या. पण सर्वांचेच लक्ष होते ते विराट कोहली आणि पत्नी अनुष्का शर्मा यांच्याकडे लागून होत. विराटची पत्नी अनुष्का शर्मा हिने आपल्या मुलीला “वामीका” हिला कडेवर घेतल होत. त्या फोटोमध्येच काय आजवर कोणत्याही फोटोमध्ये विराटच्या मुलीचा फोटो समोरून घेण्यात आलेला नाही. लाइमलाईट पासून तिला कायम दूरच ठेवण्यात आलं आहे. आजवर तिचा चेहरा दिसणारा एकही फोटो सोशिअल मीडियावर झळकलेला नाही. यामुळेच चाहत्यांनी त्यादिवशी तरी विराटच्या मुलीचा चेहरा पाहायला मिळेल या आशेने सोशिअल मीडियावर फोटो शोधायला सुरवात केली. पण त्यांच्या हाती निराशाच आली. अभिनेते आणि अभिनेत्री आपल्या मुला मुलींचा चेहरा मीडियासमोर येऊ देत नाही कारण त्यामुळे त्या प्रकाश झोतात येतात आणि उगाचच आपणही स्टार आहोत अशी कल्पना त्यांच्या मनावर बिंबते.

विराटची मुलगी वामीका कोहली हिचे बरेचसे फोटो विराटने चाहत्यांशी शेअर केले आहे पण एकही फोटोमध्ये तिचा चेहरा दाखवण्यात आलेला नाही. विराटलाही आपल्या मुलीला उगीचच प्रकाशझोतात आणावंस वाटत नाही. पण हे सर्व बाजूला ठेऊन आता भारतीय संघाने आपल्या खेळावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे टी २० विश्वकपला खूप मोठं स्थान आहे. प्रत्येक देश त्यासाठी मेहनत घेताना पाहायला मिळतो. टॉस कोणीही जिंको ते महत्वाचं देखील असेल कदाचित पण आपण देखील मेहनत घेतली पाहिजे. इतर देशही टॉस हरतात पण ते इतक्या सहजासहजी हार मानताना दिसले नाही. सुरवातीच्या काही ओव्हर संथ गतीने खेळून विकेट जाऊ न देता टिकून राहून खेळ केला तर राहिलेल्या काही ओव्हरमध्ये चांगले रण बनू शकतात हे काही सामन्यातून दिसून आलय. असो आपण इथे बोलून कस खेळावं हे सांगण्यापेक्षा त्यांना त्या खेळाचा जास्त अनुभव आहे. ते योग्य रणनीती वापरून पुढील सामन्यात चांगली कामगिरी करून दाखवतील अशी आशा बाळगुयात. भारतीय संघाला उर्वरित सामन्यांसाठी खूप खूप शुभेच्छा…