आधी पीएसआय मग अभिनेत्री आणि आता एक पत्नी हा प्रवास आहे दबंग गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेल्या पल्लवी जाधवचा. पल्लवी आणि कुलदीप या दोघांनी रविवार १५ मे २०२२ रोजी औरंगाबाद येथे एकमेकांबरोबर लग्नगाठ बांधली. त्यांचे लग्नसोहळ्याचे काही सुंदर फोटो अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यामध्ये दोघेही खूप खुश दिसत आहेत. या दोघांनी लग्नात पांढऱ्या रंगाचा पोशाख परिधान केला आहे. तसेच रिसेप्शन लूकसाठी पल्लिविने लाल रंगाचा शालू नेसला आहे. सध्या दोघांच्या या फोटोंवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केलाय.

पल्लवी ही आधीच बेधडक आणि बिनधास्त त्यात ती दबंग गर्ल म्हणून प्रसिद्ध आता या कारणामुळे पल्लविला अनेक मुलांनी लग्नासाठी नकार कळविला. मात्र कुलदीपला तिच्यातील हीच दबंगगिरी भावली आणि त्याने सात जन्मासाठी पल्लविचा हात हाती घेतला. पल्लवीला लहानपणापासून अभिनयाची आवड होती. मात्र घरची परिस्थिती तितकीशी चांगली नसल्याने शिक्षणासाठी आई बाबांनी तिला ५ हजार रुपये कर्ज काढून दिले होते. त्यामुळे पुढे तिने कमवा आणि शिका या योजनेतून एम ए मानसशास्त्र विषयाची पदवी मिळवली. याच वर्षी तिने दुसऱ्या प्रयत्नात पीएसआय परीक्षेत देखील यश मिळवलं. जालना जिल्ह्यातील महिला सुरक्षेसाठी नेमलेल्या दामिनी पथकात तिची नियुक्ती झाली आणि पुढे तिच्या कामामुळे तिला दबंग गर्ल हे नाव मिळाले. पल्लवीने जयपूरमध्ये ग्लॅमॉन मिस इंडिया स्पर्धेत फर्स्ट रनरअप हा किताब जिंकला आहे. लवकरच बबन चित्रपट दिग्दर्शक भाऊराव कराडे यांच्या “हैद्राबाद कस्टडी” या चित्रपटात नायिका बनून पल्लवी प्रेक्षकांच्या भटीला येणार आहे.