Breaking News
Home / जरा हटके / अभिनेत्री अमृता पवार झाली पाटलांची सून एकदम दणक्यात झालं लग्न

अभिनेत्री अमृता पवार झाली पाटलांची सून एकदम दणक्यात झालं लग्न

तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेत आदिती देशमुख ही भूमिका करणारी अमृता पवार खऱ्या आयुष्यातही संसाराला लागली. नुकतच तिचं लग्न दणक्यात पार पडलं. इंजिनीअर असलेल्या नील पाटीलशी अमृताचा थाटात विवाह झाला आणि पवारांची अमृता पाटलांची सून झाली. अमृता पवारने चार दिवसांपूर्वीच तिच्या इन्स्टापेजवर बॅचलर पार्टीचे फोटो शेअर केले होते. आता एकटीचे दिवस संपले, नवी सुरूवात होणार अशी तिची कॅप्शन वाचून चाहत्यांनाही तिच्या लग्नाचे वेध लागले होते. अमृता पवारच्या मेहंदी, हळदीचेही फोटो सोशलमीडियावर व्हायरल झाले. आता तिच्या लग्नाची धूमही चाहत्यांनी सोशलमीडियावर अनुभवली आणि तिला खूप शुभेच्छाही दिल्या…

actress amruta pawar
actress amruta pawar

गेल्या काही दिवसांपासून मनोरंजन विश्वातील कलाकारांच्या घरात लगीनघाई सुरू आहे. मालिकांमधून मोठा ब्रेक घेत कलाकार त्यांच्या खऱ्याखुऱ्या आयुष्यातील लग्नाचा सोहळा साजरा करताना दिसत आहेत. हृता दुर्गुळे, शिवानी रांगोळे यांच्या लग्नाचीही खूप चर्चा झाली. ४ एप्रिल रोजी नील पाटीलसोबत जोडीचा फोटो शेअर करत अमृता पवारने ती लवकरच लग्न करणार असल्याची बातमी दिली होती. तिच्या साखरपुडयाचे फोटोही चाहत्यांना खूप आवडल्याच्या कमेंट तिला मिळाल्या. तेव्हापासूनच अमृताचं लग्न कधी हा विषय चर्चेत होता. २ जुलै रोजी अमृताच्या घरी लग्नाचे विधी सुरू झाले होते. मुहूर्तमेढ झाल्यानंतर अमृताचा मेंदीचा सोहळा रंगला. निळ्या रंगाच्या वनपीसमध्ये मेंदी सोहळयासाठी सजलेल्या अमृताच्या फोटोंनी कमाल केल्याचंही चाहत्यांनी पाहिलं. तर हळदी कार्यक्रमासाठी पिवळ्या आणि गुलाबी रंगाच्या साडीसोबत अमृताने घातलेल्या फ्लॉवर ज्वेलरीत तिचं सौंदर्य खुललं होतं. अमृताचा लग्नाचा लुक कसा असेल याकडे तिच्या चाहत्याचं लक्ष लागलं होतं.

amruta pawar wedding
amruta pawar wedding

अमृता आणि नील यांच्या लग्नाचा बार उडाला आणि त्यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाले. अमृताच्या लग्नाला तिच्या तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेतील देशमुख कुटुंबही हजर होतं. लग्नासाठी अमृतानं पिवळ्या रंगाची आणि मोरपंखी काठाची नऊवारी साडी नेसली होती. महाराष्ट्रीयन पारंपरिक लुकमध्ये अमृता खूपच सुंदर दिसत होती. तर तिचा नवरा नील यानेही फिकट गुलाबी रंगाचा शेरवानी घातला होता. अमृता सध्या तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेत आदिती ही भूमिका करत आहे. समजूतदार आणि हुशार आदिती या भूमिकेतून अमृता घराघरात लोकप्रिय झाली आहे. या मालिकेत अमृता आणि हार्दिक जोशी यांची जोडीही प्रेक्षकांना आवडत असल्याच्या प्रतिक्रिया येतात. यापूर्वी अमृता स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेत जिजाऊंच्या भूमिकेत दिसली होती. ही मालिका सुरू असतानाच अमृताला करोनाची लागण झाल्यामुळे तिला ही मालिका अर्ध्यातच सोडावी लागली होती.

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *