आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचा लावणी नृत्य हा एक अविभाज्य भाग आहे. अशात गेल्या काही दिवसांपासून चंद्रमुखी या चित्रपटाच्या तालावर संपूर्ण रसिक प्रेक्षक थिरकत आहेत. अभिनेत्री अमृता खानविलकरने आपल्या नृत्याने या चित्रपटाला चार चाँद लावले आहेत. अशात या चित्रपटाच्या यशानंतर अमृता तिच्या यशात महत्वाचे शिलेदार असलेल्यांचे आभार मानत आहे. चंद्रमुखी हा चित्रपट त्याच्या कथेमुळे आणि गाण्यांमुळे चांगलाच गाजतोय. अमृताने चित्रपटाच्या यशासाठी खूप मेहनत घेतली.

लावणीतील अदा आणि नृत्याचा ठेका धरत आज “वाजले की बारा” नंतर तिने सर्वांचं “चंद्रा” या गाण्याने बेधुंद केलं. अशात सध्या ती सोलापूरला गेली आहे. इथे आल्यानंतर तिने आई भवानी आणि स्वामींचे दर्शन घेतले. चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी देखील ती दर्शनासाठी आली होती. यावेळी तिने देवाकडे घातलेलं सकड देवानं पूर्ण केल्याने तिने पुन्हा एकदा देवाच्या पायी नतमस्तक होऊन देवाचे आभार मानले. अमृता सोलापुरात दाखल झाल्यावर तिने देवदर्शनाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्याला चाहत्यांकडून भरपूर पसंती मिळत आहे. या व्हिडिओमध्ये तिचा देवदर्शनाचा प्रवास दिसत असून ती म्हणत आहे की, “सोलापूर, सोलापूर म्हटलं की, अक्कलकोट आणि तुळजापूर केल्याशिवाय जायचं नाही, स्वामींचं आणि तुळजा भवानीचं दर्शन घेतल्याशिवाय परतायचं नाही. लहापणापासूनची ही सवय. कलाकार म्हटलं की, ठिकठिकाणी फिरायला मिळतं पण देवीच बोलावणं असल्याशिवाय तिच्या दारात जाता येतं नाही.

चंद्रमुखी रिलीज व्हायच्या आधी आले होते आणि आता चंद्रमुखी रिलीज झाल्यानंतर फक्त आभार मानायला आले.” आपल्या सर्व इच्छा आकांशा पूर्ण होण्यासाठी आपण देवाकडे प्रार्थना करतो. अशीच प्रार्थना अमृताने ही केली आणि तिची हाक देवाने देखील ऐकली. अमृताने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अशात नटरंग या चित्रपटात तिच्या वाजलेकी बारा या गण्यानेच तिकीट बारीवर गर्दी उफळली होती. तिच्या दमदार अभिनयाने तिने झी टॉकीज महाराष्ट्राची फेव्हरेट नायिका या पुरस्कारावर देखील आपले नाव कोरले आहे.