तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून पाठकबाई आणि राणादाची जोडी सुपरहिट झाली होती. ही भूमिका साकारली होती अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी यांनी. मालिकेतील रील लाईफ कपल आता लवकरच रिअलाईफमध्ये लग्नबांधनात अडकणार आहेत. नुकतेच हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांनी साखरपुडा केला आहे. साखरपुड्याचे काही खास फोटो या दोघांनी सोशल मीडियावर शेअर करून चाहत्यानाच नव्हे तर सहकलाकारांना देखील आश्चर्याचा धक्का दिला आहे. मंगळवारी मोठ्या थाटात पार पडलेल्या साखरपुड्याचे सुंदर फोटो सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. त्यांच्या या फोटोंवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

तुझ्यात जीव रंगला या मालिकेनंतर हे दोघेही झी मराठीच्या वेगवेगळ्या मालिकेत पाहायला मिळाले. हार्दिक जोशीने तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेतून मुख्य नायकाची भूमिका साकारली तर अक्षयाने हे तर काहीच नाय या शोचे सूत्रसंचालन केले. काही दिवसांपूर्वीच अक्षयाने तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेच्या सेटवर हजेरी लावली होती. हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर या दोघांचे शिक्षण पुण्यातच झाले आहे. मात्र मालिकेमुळे हे दोघेही अनेकदा एकत्र आलेले पाहायला मिळाले. अगदी राणदाची थंडाई या नावाने हार्दिक ने कोल्हापूर येथे व्यवसाय सुरू केला त्यावेळी अक्षयाने आवर्जून हजेरी लावलेली पाहायला मिळाली. मात्र मालिकेत एकत्रित काम करत असल्याने त्यांच्यात मैत्रीचे संबंध आहेत असेच चाहत्यांना वाटत होते. परंतु आता या दोघांनी गुपचूप साखरपुडा करून सर्वांना आश्चर्याचा सुखद धक्काच दिला आहे. हार्दिक जोशीने मराठी मालिका सृष्टीत जम बसवण्यागोदर बॉलिवूड सृष्टीत बॅक आर्टिस्ट म्हणून काम केले होते.

हापूस या मराठी चित्रपटात त्याला छोटीशी भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती. तुझ्यात जीव रंगला मालिकेमुळे हार्दिक जोशीला आणि अक्षया देवधरला अमाप लोकप्रियता मिळाली. यातूनच हर्डीकला पुन्हा एकदा मुख्य नायकाची भूमिका मिळाली.तर अक्षया देवधर तुझ्यात जीव रंगला या मालिकेत काम करत होती त्यावेळी ती सुयश टिळक सोबत रिलेशनशिपमध्ये होती. मात्र दोघांमध्ये काहीतरी बिनसले आणि त्यानंतर दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगू लागल्या. यामुळे अक्षया एकाकी पडली होती. मात्र साखरपुड्याची बातमी तिच्या चाहत्यांसाठी सुखावणारी ठरली आहे. आता हे दोघे लग्न कधी करणार याकडे चाहत्यांचे लक्ष्य लागून राहिले आहे.