जरा हटके

प्रसिद्ध अभिनेत्रीने गळफास घेऊन संपवलं जीवन … “बुरी कल भी नहीं थी और अच्छी आज भी नहीं हूं” म्हणत

वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी अभिनेत्री आकांक्षा दुबे हिने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे समोर आले आहे. वाराणसी येथील सारनाथ पोलिसस्टेशन जवळील सोमेन्द्र हॉटेल मध्ये तिचा मृतदेह मिळाला. आकांक्षा एक हरहुन्नरी अभिनेत्री होती तिच्या अशा अचानक एक्झिटमुळे संपूर्ण भोजपुरी इंडस्ट्री हळहळ व्यक्त करत आहे. आकांक्षाचा मृत्यू होण्याअगोदर एक व्हिडिओ सॉंग रिलीज करण्यात आला होता. त्या गाण्यात आकांक्षा पवन सिंह सोबत झळकताना दिसली. अवघ्या काही तासात या गाण्याला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. मात्र असे यश मिळाल्यानंतरही तिने असे टोकाचे पाऊल का उचलले याबाबत खेद व्यक्त केला जात आहे.

Akanksha Dubey actress
Akanksha Dubey actress

आकांक्षा दुबे हिचे आईवडील कामानिमित्त मुंबईला आले होते. आपल्या मुलीने आयपीएस अधिकारी बनावे अशी त्यांची मनापासून इच्छा होती. मात्र चिमुरड्या आकांक्षाला नाच गाण्यात आणि अभिनयाचा रस वाटू लागला. याचमुळे तिने आपली पाऊलं त्या दृष्टीने वळवली होती. भोजपुरी गाण्यांमधून आकांक्षाला चांगली संधी मिळत गेली. राकेश मिश्रा यांच्यासोबत ती पाहिल्यांदा एका गाण्यात झळकली. समर सिंह सोबत ती अनेकदा एकत्र दिसली. त्याच्यासोबत ती व्हिडीओ सुद्धा बनवू लागली. त्यावरून हे दोघेही एकमेकांना डेट करत आहेत अशा चर्चा रंगू लागल्या. दोघांची जोडी प्रेक्षकांना सुद्धा खूप आवडू लागली होती. आकांक्षाची कारकीर्दी भरभराटीला येत असतानाच ती ने असे टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण अजून स्पष्ट झाले नसले तरी मृत्यू अगोदर चार दिवसांपूर्वी तिने सोशल मीडियावर शेवटचा एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यात ती म्हणाली होती की, ‘बुरी कल भी नहीं थी और अच्छी आज भी नहीं हूं’. तिच्या या रीलचे कारण स्पष्ट झालेले नाही मात्र तिचे चाहते त्या व्हिडिओवरून आता नवनवीन तर्क लावण्याचा प्रयत्न करत आहेत.

actress akanksha dubey
actress akanksha dubey

कला सृष्टीत कोणाला यश मिळते तर कोणाला अपयश पचवावे लागते मात्र असे असूनही खूप कमी वयातच टोकाचा निर्णय घेत असताना त्यावर विचार करणे खूप गरजेचे झाले आहे. काही महिन्यांपूर्वी हिंदी मालिका अभिनेत्री तुनिशा शर्मा हिने देखील मालिकेचा सेटवर गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यावेळी हिंदी मालिका सृष्टी हादरली होती. असे टोकाचे निर्णय घेण्याअगोदर सगळ्यांनी आपल्या घरच्या व्यक्तींचा विचार करावा असे मत व्यक्त केले जात आहे. मात्र आकांक्षा दुबेच्या बाबतीत नेमके काय घडले याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान आकांक्षाचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून सखोल चौकशी केली जात आहे. चौकशीत काय उघड होणार ह्याकडे आता सर्वांचेच लक्ष लागून आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button