Breaking News
Home / जरा हटके / अभिनेते यतीन कार्येकर यांची मावशी आणि आई होत्या सुप्रसिद्ध अभिनेत्री

अभिनेते यतीन कार्येकर यांची मावशी आणि आई होत्या सुप्रसिद्ध अभिनेत्री

दसऱ्याच्या मुहूर्तावर म्हणजेच ५ ऑक्टोबर २०२२ रोजी ‘शिवप्रताप गरुडझेप’ हा बहुचर्चित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आग्रा भेटीचा थरार आणि छत्रपतींची सुखरूप सुटका या चित्रपटातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. डॉ अमोल कोल्हे, प्रतीक्षा लोणकर, मनवा नाईक, यतीन कार्येकर, पल्लवी वैद्य, हरक भारतीय, हरीश दुधाडे, शैलेश दातार, आदि इराणी, अजय तपकिरे, रमेश रोकडे, विश्वजित फडते आदींच्या या चित्रपटात महत्वाच्या भूमिका आहेत. यतीन कार्येकर या चित्रपटात बादशाहचे पात्र साकारत आहेत. यतीन कार्येकर यांनी अनेक हिंदी चित्रपट, मालिकेतून काम केले आहे. आज त्यांच्याबद्दल माहीत नसलेल्या काही खास गोष्टी जाणून घेऊयात… दूरदर्शनवरील शांती या मालिकेने यतीन कार्येकर यांना मोठी लोकप्रियता मिळवून दिली होती. वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी त्यांनी या मालिकेत ६० वर्षीय कामेश महादेवन हे पात्र साकारले होते.

Jyotsna Karyekar yatins mother
Jyotsna Karyekar yatins mother

अभिनय संपन्न अशा कुटुंबात यतीन कार्येकर यांचा जन्म झाला. त्यांची आई ज्योत्स्ना कार्येकर या अभिनेत्री होत्या. हिंदी मराठी मालिका तसेच चित्रपटातून त्यांनी अनेक महत्वपूर्ण भूमिका साकारल्या. शांती या मालिकेतून दोघानीही एकत्रित काम केले होते. कहानी घर घर की, राख, जोश, सत्त्या असे जाही चित्रपट तसेच कहानी घर घर की या हिंदी मालिकेत त्यांनी साकारलेली नानी ही भूमिका अतिशय गाजली होती. राजा की आयेगी बारात, शांती , साथ निभाना साथीयां या त्यांनी अभिनित केलेल्या हिंदी मालिका.ज्येष्ठ अभिनेत्री डॉ. ज्योत्स्ना कार्येकर यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी मुंबईत एका खासगी रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले होते. यतीन कार्येकर यांचे वडील डोळ्यांचे डॉक्टर. यतीन कार्येकर, प्रफुल्ल, डॉ. चेतन ही त्यांची तीन अपत्ये. ज्योत्स्ना कार्येकर या पूर्वाश्रमीच्या कामेरकर. वसंतराव कामेरकर यांच्या त्या कन्या. वसंतराव कामेरकर हे एचएमव्हीमध्ये वरिष्ठ ध्वनिमुद्रक म्हणून कार्यरत होते. कामेरकर कुटुंबीय मूळचे पेणचे. कामेरकर यांच्या घरी दिग्गज गायकांच्या मैफली रंगायच्या तर नाटकाच्या तालमीही व्हायच्या. कलेचा हा वारसा ज्योत्स्ना कार्येकर यांच्यासह सुलभा देशपांडे, प्रेमा साखरदांडे, आशा दंडवते या त्यांच्या अभिनेत्री बहिणींनाही लहानपणापासूनच मिळाला. या सर्व बहिणींनी अभिनय क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. सुलभा देशपांडे या यतीन कार्येकर यांची मावशी. निनाद देशपांडे हा सुलभा देशपांडे यांचा मुलगा. फुलाला सुगंध मातीचा मालिकेतील जिजी आक्का म्हणजेच आदिती देशपांडे या सुलभा देशपांडे यांच्या सून.

actress sulbha deshpande yatils mavshi
actress sulbha deshpande yatils mavshi

गायक, नट चंद्रशेखर उर्फ बापू कामेरकर हे सुलभा देशपांडे यांचे थोरले बंधू. तर तेंडुलकरांच्या ‘गिधाडे’मधला अशोक कामेरकर हा त्यांचा धाकटा भाऊ. नेपथ्यकार आणि प्रकाशयोजनाकार विश्वनाथ उर्फ विसू कामेरकर हा सुलभा देशपांडे यांचा धाकटा भाऊ. त्यामुळे जवळपास अख्खे कामेरकर कुटुंबच रंगभूमीशी निगडित होते असे म्हणायला हरकत नाही. याच कलाकारांच्या छायेत यतीन कार्येकर लहानाचे मोठे झाले. यतीन कार्येकर यांनी सुरुवातीला जाहिरातींमधून काम केले. कॅप्टनकुकच्या जाहिराती नंतर सहज म्हणून ते स्टीडिओत गेले तेव्हा शांती मालिकेसाठी त्यांची निवड करण्यात आली होती. मुन्नाभाई एमबीबीएस, कयामत से कयामत तक, इकबाल, दगडी चाळ, बाजीराव मस्तानी, रॉकी अशा चित्रपटातून ते दमदार भूमिकेत दिसले. शिवप्रताप गरुडझेप या चित्रपटामुळे त्यांना पुन्हा एकदा क्रूर औरंगजेबाची भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. राजा शिवछत्रपती मालिका, स्वराज्य सौदामीनी ताराराणी या मालिकेनंतर आता ता चित्रपटात यतीन कार्येकर अशीच भूमिका साकारताना दिसत आहेत.

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *