महेश कोठारे निर्मित ”दख्खनचा राजा ज्योतिबा” ह्या मालिकेत ‘चोपडाईची’ भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री नुकतीच विवाहबद्ध झाली आहे. चोपडाईची भूमिका अभिनेत्री सई कल्याणकर हिने बजावली होती. या मालिकेत ज्योतिबांच्या भूमिकेत अभिनेता विशाल निकम झळकला होता. काही दिवसांपूर्वी सई कल्याणकर हीने सोशल मीडियावर आपला साखरपुडा झाल्याचे सांगून साखरपुड्याचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले होते. नुकतेच सई कल्याणकर आणि तिचा होणारा नवरा प्रशांत शिवराम चव्हाण यांचे केळवण साजरे करण्यात आले.

त्यावरून आता हे दोघे लवकरच लग्न करत असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर या दोघांचे प्रिवेडिंग फोटो शूट करण्यात आले. गेल्या दोन दिवसांपासून सई कल्याणकर हिच्या घरी लगीनघाई सुरू झाली आहे. शुक्रवारी मेहेंदीचा आणि शनिवारी हळदीचा सोहळा पार पडला असून आज रविवारी १९ डिसेंबर २०२१ रोजी सई कल्याणकर प्रशांत चव्हाण सोबत विवाहबंधनात अडकली आहे. लग्नाचे खास फोटो तीनदा सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंवर सेलिब्रिटींनी शुभेच्छा दिल्या आहेत. प्रशांत चव्हाण हा पेशाने डॉक्टर आहे. डॉ प्रशांत चव्हाण यांनी नॅनो केमिस्ट्री विषयातून पीएचडी केली आहे. अभिनेत्री सई कल्याणकर आणि डॉ प्रशांत चव्हाण यांचं हे अरेंज मॅरेज आहे. दख्खनचा राजा ज्योतिबा या मालिके व्यतिरिक्त सईने बऱ्याच मालिकांत आणि चित्रपटात देखील काम केलं आहे. अभिनेता अंकुश चौधरी ह्यांच्यासोबत ती झकास ह्या चित्रपटात झळकली होती. सई कल्याणकर हि एक उत्कृष्ट नृत्यांगना असून तिने भरतनाट्यम विशारद प्राप्त केली आहे. स्टार प्रवाहवरील ”तुझे नि माझे घर श्रीमंताचं” या मालिकेतून तिने महत्वाची भूमिका बजावली होती.

झी युवा वरील फ्रेशर्स या मालिकेत तसेच कलर्स मराठीवर “गणपती बाप्पा मोरया” ह्या अध्यात्मिक मालिकेतून तिने सिद्धी ची व्यक्तिरेखा साकारली होती. “भेटी लागी जिवा” या लोकप्रिय मालिकेतून देखील सईने महत्वाची भूमिका निभावली होती आपल्या सहज सुंदर अभिनयामुळे तिला एका मागून एक मालिका मिळत गेल्या. विशेष म्हणजे हे सगळं चालू असताना देखील अथर्व थिएटर्सच्या आम्ही पाचपुते ह्या नाटकात देखील ती झळकली. मालिका चित्रपट आणि नाटक ह्या तिन्ही क्षेत्रात सईने आपला जम बसवलेला पाहायला मिळतो. आपल्या लग्नानंतर देखील ती मराठी मालिका आणि चित्रपटांत काम करण्याची इच्छा तिने व्यक्त केली आहे. सई कल्याणकर आणि प्रशांत चव्हाण या नवविवाहित दाम्पत्यास आयुष्याच्या या नव्या वाटचालीसाठी शुभेच्छा…