बिग बॉस मराठी सीजन ३ संपून आता काही दिवस ओलांडल्यावर विशाल निकम आणि विशाल पाटील ह्या दोघा जिवाभावाच्या मित्रांनी जोतिबाचा दर्शन घेतलं. ह्या दोघांचे व्हिडिओ आणि फोटो सोशिअल मीडियावर पाहायला मिळत आहेत. बिग बॉसच्या घरात दोघांची घट्ट मैत्री झालेली पाहायला मिळाली. १०० दिवस घरात राहून विशाल निकम बिगबॉसचा विजेता बनला खरा पण त्याहून हि अधिक आनंद विकास पाटील ह्याला झालेला पाहायला मिळाला. एक खास व्हिडिओ शेअर करत त्याने २०२१ सालच्या शेवटी मला जे काही मिळालं त्याबद्दल आभार मानले आहेत. याचसोबत त्याने विशाल निकम हाच विजेता होणार असल्याचं वाटत असल्याचं देखील सांगितलं तो सच्या खेळ खेळला आणि जिंकला हे त्याच यश असल्याचं तो म्हणाला.

बिगबॉसच्या घरा बाहेर देखील आमची मैत्री घट्ट असल्याचं त्याने सांगितलं आहे. पण आता चर्चा रंगतीय ती विशाल निकम याच प्रेम असलेल्या सौंदर्या हिची. बिगबॉसच्या घरामध्ये माझं सौंदर्या वर जीवापाड प्रेम असल्याचं त्याने सांगितलं होत पण खरंतर विशाल निकम आणि सोनाली पाटील यांच्या प्रेमाची देखील चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. दोघांत रुसवे फुगवे देखील झाले. विशाल निकम बिगबॉस जिंकला तेंव्हा देखील त्याने सौंदर्याचा देखील विषय काढला. आई वडील भेटायला आले होते तेव्हा सौंदर्या हे नाव घेतलं होतं पण तिचं नाव वेगळं आहे ते मी योग्य वेळ आल्यावर नक्की सांगेन. मी ज्या मुलीवर प्रेम करतो त्या मुलीचं वेगळ्या पद्धतीने नामकरण केलं. सोनालीच आणि माझं नाव जोडलं गेलं होत आमच्यात फक्त मैत्री होती. माझं बिगबॉसच्या घरात येण्याआधीच माझं सौंदर्यावर प्रेम होत आणि वेळ आल्यावर नक्कीच मी तीच नाव सांगेल. सध्या आमच्यात काही गैरसमज निर्माण झाले आहेत ते मिटले कि मी तिचं नाव नक्की सांगेण. तिचं प्रेम नसलं तरी माझं तिच्यावर मनापासून प्रेम आहे, होत आणि कायम राहीण असं तो म्हणाला होता.

स्पर्धा जिंकल्यावर सौंदर्याने विशालला मॅसेज देखील केला होता आणि फोन करून माझं अभिनंदन देखील केलं असल्याचं तो म्हणाला होता. इतकाच काय तर बिगबॉसच्या घरातून बाहेर आल्यावर मी तिला भेटून आमच्यातील गैरसमज दूर करून सर्वांसोबत ती कोण आहे हे देखील स्पष्ट करणार असल्याचं सांगितलं होत. बिगबॉसच्या घरातून बाहेर पडल्यावर त्याने शिवलीला पाटील यांची भेट घेतली त्यांनतर आपला मित्र विकास पाटील ह्याची देखील भेट घेतली पण आता नेमकी सौंदर्या आहे तरी कोण ह्याचा खुलासा त्याने करावा असं त्याच्या चाहत्यांचं मत व्यक्त होताना पाहायला मिळत आहे. तू सर्वांची भेट घेतलीस मग सौंदर्याची भेट नक्कीच घेतली असंशील मग ती नक्की कोण आहे ह्याचा खुलासा करावा असे अनेक प्रश्न नेटकरी विचारताना पाहायला मिळत आहे. काहीजण तर तुझी सौंदर्या म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून ती सोनाली पाटील असल्याचं म्हणत आता हीच खरी वेळ आहे म्हणत सौंदर्याचा खुलासा करावा असं म्हणताना पाहायला मिळत आहे. पण अजूनही विशाल निकम याने सौंदर्या बाबत कोणताही खुलासा केला नाही यामुळे चाहते नाराज असल्याचं दिसून येत आहे.