बिग बॉसच्या चावडीवर ह्या शनिवारी देखील नेहमीप्रमाणे महेश मांजरेकर यांनी मिरालाच धारेवर धरले आहे. मीरा तू खोटं बोलतेस हे तिला ठणकावून सांगत विकासने तुला कोपर मारलं नाही. तुम्ही दिघेही टास्क खेळत असताना विकास तुझ्या पुढे उभा होता आणि त्याचा हात तुला चुकून लागला. मी तो व्हिडीओ दोनदा पाहिला आहे. पण तू वारंवार विकासने मला मारलं म्हणून आरडाओरडा केलास. महेश मांजरेकर यांनी विकासची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला आहे असं मत अनेकांचं असलं तरी ते नेहमी खऱ्याचीच बाजू घेतात हे देखील सिद्ध केलं आहे.

मीरा प्रमाणे गायत्रीला देखील महेश मांजरेकर यांनी धारेवर धरले आहे. सोनालीसोबत बोलताना तू व्यवस्थित बोलतेस आणि तिथून बाहेर पडल्यावर सोनाली च्यावss च्यावss च्यावss करती असं का म्हणतेस? . गायत्री आणि मीरा ह्यावेळी महेश मांजरेकर यांची बोलणी खाताना दिसल्या मात्र त्यांना जे करायचं असतं त्या ते करतातच हे देखील अनेकदा पाहायला मिळालं आहे. आजच्या भागात मात्र प्रेक्षकांना एक वेगळेच चित्र पाहायला मिळणार आहे. सोनाली आणि विशाल यांच्यात नक्कीच काहीतरी आहे याची खात्री पटलेली पाहायला मिळणार आहे कारण सोनालीचे लग्न ठरलं आहे हे विशालला विकास कडून कळतं त्यावेळी ‘सोनाली माझ्या इमोशन्सशी खेळतीये’ असं त्याने म्हटलं होतं. सोनालीचे जर अगोदरच लग्न झाले होते तर ती मला फसवत आहे अशीच एक भावना विशालने व्यक्त केलेली पाहायला मिळाली. बिग बॉसच्या घरात विशाल आणि सोनालीमध्ये अनेकदा खटके उडाले मात्र पुन्हा ते एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसले. मात्र सोनालीच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव अक्षय आहे हे विकासने सांगताच तू काय अपेक्षा ठेवली होतीस असं महेश मांजरेकर यांनी विचारताच विशाल सोनालीला खोटं ठरवतो.

सोनाली एक गोष्ट सांगते तशी ती नाहीचए अस विशाल म्हणताच सोनाली त्याला थांबवते आणि म्हणते की ‘काही गोष्टी अशा असतात की त्या कॅमेऱ्यासमोर नाही बोलल्या जात’. त्यावर विशाल एक खुलासा करताना दिसतो. ‘सोनाली माझ्यासोबत कानामध्ये माईक सोडून काय बोलत होतीस ते तू सांगणार आहेस की मी सांगू? ‘ असं म्हटल्यावर सोनाली आणि विशाल यांच्यात नक्कीच काही तरी असणार अशी खात्री वाटत आहे. सोनालीने लग्न ठरल्याची गोष्ट विशालपासून का लपवून ठेवली होती? हे उत्तर सोनालीने दिलेले नसले तरी ती लोकांची सहानुभूती मिळवत आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो. यामुळे विशाल मात्र व्हिलन ठरला असल्याचे तोच स्पष्टीकरण देतो. आजच्या भागात सोनाली आणि विशाल यांच्यात झालेल्या बोलण्याचा खुलासा होणार का याची उत्सुकता मात्र आता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे.