मराठी चित्रपट म्हणा किंवा नाटक आपल्या सहज सुंदर अभिनयाने विजय कदम ते उत्कृष्टरित्या साकारताना पाहायला मिळतात. नुकतीच आयपीएल दरम्यान एका जाहिरातीत ते ऋषभ पंत ह्यांचा कॅच पकडताना पाहायला मिळाले हावभाव आणि टायमिंग ह्यात त्यांनी मस्त जुळवून आणली. टोपी घाला रे बच्चे सबसे अच्छे,मधुचंद्राची रात्र, देखणी बायको नाम्याची, तोचि एक समर्थ अशा अनेक मराठी चित्रपटात काम करून त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. विजय कदम यांनी ‘हळद रुसली कुंकू हसलं’ या चित्रपटात अभिनेत्री अश्विनी भावेच्या पतीची भूमिका साकारली.

सही दे सही, टूर टूर, पप्पा सांगा कुणाचे ही त्यांची नाटके देखील तुफान गाजली. विजय कदम यांच्या पत्नी पद्मश्री जोशी यांच्याशी लग्नगाठ बांधली. ह्यांची हि प्रेम कहाणी थोडी हटके आहे एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की, विजय कदम यांनी दोनदा प्रपोज करूनही त्यांनी लग्नाला नकार दिला होता परंतु “विच्छा माझी पुरी करा” या नाटकातील विजय कदम यांनी साकारलेल्या भूमिकेमुळे त्या त्यांच्या प्रेमात पडल्या आणि आपला होकार कळवला. विजय कदम आणि पद्मश्री जोशी ह्यांनी अनेक चित्रपटात एकत्र कामे देखील केली आहेत. ‘नणंद भावजय’ या चित्रपटात पदमश्री यांनी नणंदबाईंची भूमिका साकारली. ‘ चंपा चमेली की जाई अबोली ‘ हे त्यांच्यावर चित्रित झालेलं गाणं विशेष गाजलं. पोरीची धमाल बापाची कमाल, नवलकथा या चित्रपटात त्यांनी काम केले. ज्येष्ठ गायिका तसेच संगीत शिक्षिका सुषमा जोशी या अभिनेत्री पद्मश्री जोशी यांच्या आई. त्यांना एक बहीण आणि एक भाऊ आहे.

भाऊ मास्टर अलंकार हा देखील बॉलिवुड सृष्टीत एक बालकलाकार म्हणून आपले नाव लौकिक करताना दिसला. त्यानंतर तो परदेशात जाऊन आपला ५०० कोटींची उलाढाल असलेला बिजनेस सांभाळत आहे. तर छोटी बहीण पल्लवी जोशी हि देखील मराठी रंगभूमी तसेच बॉलीवूड मध्ये झळकलेली अभिनेत्री. पल्लवी जोशी हिने एक बालकलाकार म्हणून बॉलिवूड सृष्टीत आपला जम बसवला होता. आदमी सडक का, डाकू और महात्मा, छोटा बाप, रक्षाबंधन, दोस्त असावा तर असा या चित्रपटातून बाल भूमिका बजावून क्रोध, मृगनैनी, मिस्टर योगी, तलाश, ग्रहण, रिता, अल्पविराम यासारख्या मालिका आणि चित्रपटात प्रमुख भूमिका बजावल्या. प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्यासोबत पल्लवी जोशी हिने लग्न केले. हल्ली अनेक अभिनेते आणि अभिनेत्री त्यांच्या कामातील किंवा अभिनेत्यांशीच विवाह करणे पसंत करतात असं नाही तर हे अनेक वर्षांपासून घडतं आलेलं आहे कारण ते एकमेकांना चांगलं समजून घेतात आणि ह्यामुळेच अनेक कलाकार हे अभिनेत्रींशी लग्न करताना पाहायला मिळतात.