
मराठी मालिका सृष्टीतील प्रसिद्ध जोडीच्या लेकीचा नुकताच नामकरण सोहळा पार पडला आहे. या सोहळ्याचे क्षण त्यांनी सोशल मीडियावर शेअर करताच लेकीवर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. हे सेलिब्रिटी कपल आहे विजय आंदळकर आणि रुपाली झनकर आंदळकर. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे ११ जानेवारी २०२३ रोजी विजय आणि रुपालिला कन्यारत्न प्राप्ती झाली होती. ‘बाप झालो लक्ष्मी घरी आली रे!’ असे म्हणत विजयने त्याच्या इन्स्टग्रामवर ही आनंदाची बातमी शेअर केली होती. मुलीच्या जन्मानंतर जवळपास अडीच महिन्यांनी त्यांनी आपल्या मुलीचा नामकरण सोहळा साजरा केला. काल शनिवारी हा सोहळा पार पडत असताना विजय आणि रुपालीने आपल्या लाडक्या लेकीचे नाव “मायरा” ठेवल्याचे जाहीर केले.

मायरा या नावाचा अर्थ आहे प्रिय, उदार, सक्षम, प्रशंसनीय. हे नाव जाहीर करताच मायराला सुदृढ आणि समृद्धी जीवनाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. विजय आंदळकर सध्या पिंकीचा विजय असो या मालिकेत युवराजची भूमिका साकारत आहे. पिंकीचे वडील आपल्या मुलीला सुखात राहण्यासाठी युवराजची परीक्षा घेत आहेत. वडवडिलांची संपत्ती त्यागून त्याला कष्ट करून कमाई करून दाखवायची आहे. मालिकेतला हा रंजक ट्रॅक पाहून प्रेक्षक खुश झाले आहेत. मात्र जवळपास सर्वच मालिकेत असा ट्रॅक दाखवलेला पाहायला मिळाला होता. कलर्स मराठी वरील भाग्य दिले तू मला या मालिकेत सुद्धा राजला कावेरीला मिळवायचे असेल तर गावी येऊन कमाई करून दाखवायची होती. त्यानंतर झी मराठी वरील हृदयी प्रीत जागते या मालिकेत सुद्धा असेच वळण आलेले पाहायला मिळाले होते. त्यानंतर स्टार प्रवाह वाहिनीने देखील पिंकीचा विजय असो या मालिकेत असाच एक ट्रॅक सुरू केलेला पाहायला मिळतो आहे. मात्र जिथे युवराज आणि पिंकीचे लग्न होऊन अनेक दिवस झाले आहेत तिथे पिंकीच्या वडिलांनी केलेली ही मागणी योग्य वाटत नाही असे काही प्रेक्षकांचे म्हणणे आहे.

त्यामुळे काही प्रेक्षकांनी हा ट्रॅक इतर वाहिन्यांकडून कॉपी केला असल्याचे म्हणणे आहे. मैने प्यार किया या चित्रपटाची स्टोरी जवळपास सर्वच मराठी मालिकेतून पाहायला मिळाल्याने प्रेक्षकांनी काहीशी नाराजी दर्शवली आहे. अशा एकाच वेळी लेखकाला सुद्धा असे बदल घडवून आणायला कसे सुचते? हा प्रश्न मालिकेच्या प्रेक्षकांना पडला आहे. मात्र तरीही मराठी मालिकेवरील प्रेमाखातर प्रेक्षक याकडे दुर्लक्ष करत आले आहेत. तूर्तास विजय आंदळकर मालिकेतून युवराजच्या भूमिकेमुळे प्रेक्षकांची विशेष पसंती मिळवत आहे. त्याने अजूनतरी आपल्या लेकीला मिडियासमोर आणले नसले तरी त्याची लाडकी लेक कशी दिसते याची उत्सुकता मराठी प्रेक्षकांना कायम राहणार आहे. अभिनेता विजय आंदळकर आणि अभिनेत्री रुपाली याना ह्या सुवर्णक्षणातही खूप खूप शुभेच्छा…