
स्वराज्य रक्षक मालिकेत छोटी पण तितकीच दमदार भूमिका साकारणारा अभिनेता उज्वल रघुनाथ धनगर ह्यांचं नुकतंच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. फक्त मालिकाच नाही तर अनेक नाटकांत त्यांनी आपल्या कलेची जादू दाखवली होती. आपल्या उत्तम अभिनयाने आणि शब्दावरील प्रभुत्वाने तो प्रेक्षकांच्या नेहमीच हृदयावर राज्य करायचा. स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत त्याने “खाशाबा” आयुर्वेदिक जडीबुटी झाडपाला आणून देणाऱ्या आणि त्यातून महाराज्यांना गडावर काय चाललंय हे सांगणाऱ्या माणसाची महत्वाची व्यक्तिरेखा साकारली होती.

उज्वल रघुनाथ धनगरने याआधी क्राईम पेट्रोल, लक्ष, स्वराज्यरक्षक संभाजी ह्या मालिकांत तर ” हे राम..” ह्या नाटकांत त्यांनी अभिनय साकारला होता. एक उत्तम सूत्रसंचालक म्हणूनही त्याने आपलं नावलौकिक मिळवलं होत. उज्वल रघुनाथ धनगरच्या जाण्याने अनेक मराठी कलाकारांनी हळहळ व्यक्त करत कॉमेंट द्वारे जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील “खाशाबा” मुळे त्याला चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. स्वराज्य जजनी जिजामाता मध्ये देखील त्याने अभिनय केल्याचं समजत. सोशिअल मीडियावर अनेक कलाकारांनी त्याला श्रद्धांजली वाहत त्याच्या कामाचं कौतुक करत तू आमच्या मनात कायम राहशील अगदी कमी वयात त्याने जगाचा निरोप घेणं हे न पटण्यासारखं आहे असे म्हटले आहे. अभिनेता उज्वल रघुनाथ धनगर ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली !!!
