Breaking News
Home / जरा हटके / तू तेव्हा तशी मालिकेत राधाच्या आयुष्यात आलेला नील आहे तरी कोण?

तू तेव्हा तशी मालिकेत राधाच्या आयुष्यात आलेला नील आहे तरी कोण?

तू तेव्हा तशी या मालिकेत अनामिक आणि सौरभ यांच्या प्रेमाला बहर आला आहेच. पण आता राधा आणि नील यांच्यातही प्रेम फुलताना दिसणार आहे. मालिकेतील नीलची भूमिका करणारा स्वानंद केतकर आता कथेच्या मुख्य प्रवाहात येणार आहे. नील आहे तरी कोण याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. मराठी मालिकांमध्ये सध्या नवे ट्रेंड येताहेत. यामध्ये वयाच्या चाळीशीनंतर आयुष्यात येणारं प्रेम, त्यामध्ये येणारे अडथळे, त्यातून फुलणारं नातं हा फ्लेवर प्रेक्षकांनाही आवडतोय. एकीकडे सेकंड इनिंग दाखवत असताना मालिकेच्या तरूण प्रेक्षकांनाही खिळवून ठेवण्याचा फंडा वापरला जातोय. तू तेव्हा तशी या मालिकेला पसंती मिळतेय ती याच कारणामुळे. अनामिका आणि सौरभ यांच्यातील वयाच्या चाळीशीतलं प्रेम फुलवताना अनामिकाची मुलगी राधा हिच्याही आयुष्यात खरं प्रेम आलं आहे ते नील याच्या रूपाने. मालिकेतील हा ट्रॅक सध्या हिट होतोय.

swanand ketkar tu tenvha tashi
swanand ketkar tu tenvha tashi

कधी मालिकेतील एक दुसऱ्या टप्प्यातील पात्र अचानक कथेच्या मुख्य प्रवाहात येतं. तू तेव्हा तशी या मालिकेतील नील ही भूमिका सध्या फ्रंटफूटवर आली आहे. अनामिकाच्या ऑफीसमध्ये काम करणारा एक मुलगा, जेमतेम परिस्थिती असलेला, माईमावशीच्या मेसमध्ये जेवणारा नील म्हणजेच स्वानंद केतकर आता कथेच्या मुख्य प्रवाहात येणार आहे. नील ही भूमिका करणाऱ्या स्वानंद केतकरविषयी जाणून घेण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक आहेत. अनामिकाच्या मुलीच्या भूमिकेत रूमानी खरे हिने बाजी मारली आहे. आजच्या तरूण पिढीचं प्रतिनिधीत्व करणारी राधा प्रेक्षकांनाही आवडतेय. हितेनसोबत लिव्ह इन लेशनशीपमध्ये राहण्याची स्वप्नं पाहणाऱ्या राधाला हितेनने नुकतच डिच केलय. राधावर प्रेम करणारा नील यामुळे सुखावला आहे. याच वळणावर राधा आणि नील यांच्यातील लव्हट्रॅक फुलणार आहे. त्यामुळे आता मालिकेत पुढच्या भागात राधा आणि नील यांचीही लव्हस्टोरी पहायला मिळेल. नीलची भूमिका करणाऱ्या स्वानंद केतकर यांची ही पहिलीच मालिका आहे. यापूर्वी स्वानंदने नाटक, एकांकिका याबरोबरच आपली सोसल वाहिनी या सेगमेंटमधून भूमिका साकारल्या आहेत. गेल्या काही दिवसांत मालिकांमधून नवे चेहरे प्रेक्षकांसमोर येत आहेत, यामध्ये स्वानंदने नील ही भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. तू तेव्हा तशी या मालिकेत स्वानंदचा सध्याचा ट्रॅक मुख्य प्रवाहात आल्याने तोही खूप खुश आहे.

actor swanand ketkar
actor swanand ketkar

नीलची भूमिका करणाऱ्या स्वानंदविषयी जाणून घेण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक आहेत. मुंबईकर असलेल्या स्वानंदला लहानपणापासूनच अभिनयाची आवड आहे. कॉलेजमध्येच त्याला अभिनयाची गोडी लागली आणि त्याने खूप बक्षीसंही मिळवली. स्वानंदने कलाश्रय नावाच्या संस्थेची स्थापना केली आहे ज्यामधून तो संगीत कार्यशाळा, वारली आर्ट यासारखे उपक्रम राबवतो. स्वानंद हा सोशल मीडियावर मजेशीर व्हिडिओही बनवत असतो. अभिनयाची उत्तम जाण असलेल्या स्वानंदला तू तेव्हा तशी ही मालिका मिळाली तेव्हा त्याची भूमिका खूप छोटी होती. पण सुहास जोशी, स्वप्नील जोशी, शिल्पा तुळसकर, अभिज्ञा भावे यांच्यासारख्या कलाकारांसोबत काम करायला मिळणार हीच गोष्ट त्याच्यासाठी भाग्याची होती असं तो सांगतो. आता मात्र स्वानंदने साकारलेला नील हा राधाच्या निमित्ताने अनामिकाच्या घरातील प्रमुख सदस्य होणार आहे. राधाला खऱ्या प्रेमाची जाणीव करून देण्यासाठी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अनामिका आणि सौरभ यांच्या प्रेमाला साथ देण्यासाठी राधाचं मन वळवण्यातही नील म्हणजेच स्वानंदची भूमिका मालिकेत महत्त्वाची ठरणार आहे.

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *