तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील राणादा आणि अंजली म्हणजेच हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांनी नुकताच साखरपुडा केला. त्यांनी दिलेला हा सुखद धक्का चाहत्यांनाही सुखावून गेला. अक्षया आणि हार्दिकच्या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला. या कमेंटमध्ये एका खास कमेंटने लक्ष वेधून घेतले. अक्षयाच्या आयुष्यातील एका खास व्यक्तीने ती कमेंट केली आहे त्यामुळेच साखरपुड्याच्या बातमीसोबत त्या कमेंटचीही चर्चा रंगली. अक्षयाचा एक्स बॉयफ्रेंड अभिनेता सुयश टिळक याची ती कमेंट आहे. त्याने अक्षया आणि हार्दिकचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत.

तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील ऑनस्क्रिन जोडी म्हणजे राणादा आणि अंजली पाठक यांनी खऱ्या आयुष्यातही एकमेकांना जोडीदार म्हणून निवडले. ही मालिका जेव्हा सुरू होती तेव्हा हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर या दोघांच्या जोडीची केमिस्ट्री प्रेक्षकांना नेहमीच आवडायची. प्रत्यक्षातही या जोडीला एकत्र पहायला आवडेल अशा त्यांच्या चाहत्यांकडून प्रतिक्रिया यायच्या. साडेचार वर्षे गाजलेल्या या मालिकेने निरोप घेतल्यानंतर हार्दिक आणि अक्षया आपापल्या कामात व्यस्त झाले. पण त्यांची मैत्री कायम होती. एका जाहिरातीच्या फोटोशूटमध्येही दोघे एकत्र दिसले. तुझ्यात जीव रंगला या मालिकेच्या दरम्यानच अक्षया आणि सुयश टिळक एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघांनी त्यांच्या नात्याविषयी कधी जाहीरपणे सांगितले नाही. मात्र अक्षया आणि सुयश हे नेहमी एकत्र असतानाचे फोटो इन्स्टापेजवर शेअर करायचे. फोटोसोबत अशा काही ओळी लिहिलेल्या असायच्या की त्यातून ते मैत्रीपलिकडील नात्यात असल्याचे दिसून येत होते. अक्षयाच्या मालिकेचे शूटिंग कोल्हापुरात सुरू असल्याने सुयश आणि अक्षया अनेकदा कोल्हापुरात भेटायचे. पण गेल्या वर्षी त्यांचे ब्रेकअप झाल्याचे समोर आले. दोघांनीही सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केले. त्यानंतर सुयशने आयुषी भावे या कोरिओग्राफरसोबत लग्न केले.

अक्षया आणि हार्दिक यांच्या साखरपुड्याच्या फोटोवर सुयश काय कमेंट करणार याची उत्सुकता चाहत्यांना होतीच. सुयशने अक्षयाचे अभिनंदन करून तिला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा अशी कमेंट केली आणि दोघांमधील ब्रेकअप त्याने सकारात्मक घेतल्याचे दाखवून दिले. अक्षयानेही हार्दिकला जोडीदार निवडून तिचे आयुष्य पुढे सुरू ठेवले. सध्या हार्दिक हा तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेत सिध्दार्थच्या भूमिकेत आहे. तर अक्षयाने काही दिवसांपूर्वी हे तर कायच नाय या शोचे निवेदन केले. अभिनेता सुयश टिळक हा उत्तम अभिनेता असून सुशिक्षित आणि सुसंस्कारी असल्याचं नेहमीच पाहायला मिळत एखाद्या गोष्टीत अडकून राहण्यापेक्षा परिस्थिती नुसार बदल घडवून त्यातूनही काहीतरी चांगलं घडू शकत ह्याचा नेहमी विचार करायला शिकलं पाहिजे हेच ह्यातून पाहायला मिळत.