मराठी सृष्टीत अनेक कलाकारांची लगीनघाई झालेली पाहायला मिळत आहे. सर्वांची लाडकी शनया म्हणजेच अभिनेत्री रसिका सुनील हिने दोन दिवसांपूर्वीच आपल्या लग्नाची घोषणा केली आहे. आदित्य बिलागी सोबत रसिका सुनील लवकरच लग्न करणार आहे. तिच्या पाठोपाठ आता अभिनेता सुयश टिळकच्या घरी देखील लगीनघाई सुरू झालेली पाहायला मिळत आहे. सुयश टिळक आणि आयुषी भावे यांचा जुलै महिन्यात साखरपुडा संपन्न झाला होता. त्याचे फोटो सोशिअल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.

या बातमीने सुयश टिळक आणि आयुषीवर शुभेच्छांचा वर्षाव झाला होता. मात्र हे दोघे लग्न कधी करणार हे त्यांनी गुलदस्त्यात ठेवले होते. आयुषी एक उत्तम डान्सर आणि अभिनेत्री आहे. ‘युवा डान्सिंग क्वीन’ या डान्स रिअॅलिटी शोमध्ये आयुषी झळकली होती. याशिवाय लवकरच ती चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. आयुषी भावे आणि सुयश टिळक हे दोघे लवकरच लग्न करणार आहेत. त्यासाठीची त्यांची जोरदार तयारी देखील सुरू झालेली आहे. नुकतेच सुयश आणि आयुषीचे केळवण साजरे करण्यात आले आहे. अभिनेत्री हर्षदा खानविलकर आणि अभिनेत्री मृणाल देशपांडे यांनी त्यांचे केळवण केले आहे. हर्षदा खानविलकर, मृणाल देशपांडे आणि सुयश टिळक यांनी ‘पुढचं पाऊल’ या गाजलेल्या मालिकेत एकत्रित काम केले होते तेव्हापासून या कलाकारांची घट्ट मैत्री आहे.

सुयश टिळक आणि आयुषी भावे येत्या काही दिवसातच लग्नगाठ बांधणार आहेत. त्यानिमित्ताने त्यांना सह कलाकारांकडून शुभेच्छा देखील देण्यात येत आहेत. शुभमंगल ऑनलाइन या मालिकेत मुख्य भूमिका साकारत होता. या मालिकेने काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. मालिकेच्या एक्झिट नंतर सुयश टिळक बिग बॉसच्या घरात जाणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर व्हायरल झाली होती मात्र मी बिग बॉसच्या घरात कंटेस्टंट बनून जाणार नसल्याचे त्याने एका पोस्टद्वारे स्पष्ट सांगितले होते. असो अभिनेता सुयश टिळक आणि आयुषी भावे ह्यांना खूप खूप शुभेच्छा…