” माझ्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट सुंदर बनवणारी स्त्री” असं म्हणत अभिनेता सुयश टिळक ह्याने नुकतीच आनंदाची बातमी देत त्याच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. अनेक कलाकारांनी त्याच्या साखरपुड्याची फोटो शेअर करत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. सुयश कलर्स मराठी वाहिनीवर सध्या सुरू असलेल्या “शुभमंगल ऑनलाईन” या मालिकेत काम केल्यानंतर खरोखरच त्याच शुभमंगल झालाच दिसून येतंय. सुयशने ज्या मुलीसोबत साखरपुडा केलाय ती देखील एक मराठी अभिनेत्री आहे. त्या अभिनेत्रीचे नाव आयुषी भावे आहे.

आज 7 जून रोजी आयुषीचा भावे हीच वाढदिवस असून सुयशने तिला शुभेच्छा देत सोबतच साखरपुड्याची बातमी इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. “एक अशी महिला जिने माझ्या आयुष्यात सर्व काही सुंदर बनविले. हॅप्पी बर्थडे लव्ह” असं म्हटलं आहे. पुढे तो म्हणतो ‘तुझ्या सोबत माझे जीवन पूर्ण आहे आणि मी खूप नशीबवान व्यक्ती आहे ज्याला इतकी छान पत्नी मिळाली. सांगताना आनंद होत आहे की तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आता आम्ही अधिकृतरीत्या एकत्र आलो असून नवीन प्रवासाची सुरुवात एकत्र करणार आहोत’ . आयुषी भावे नाकी आहे तरी कोण असा सवाल तुम्हाला पडला असेल. तर आयुषी हि एक अभिनेत्री असून तिने २०१८ चा श्रावण क्वीनचा किताब मिळाला होता. ह्याच बरोबर ती झी युवा वाहिनीवरील युवा डान्सिंग क्वीन या शो मध्ये देखील होती. आयुषी भावे लवकरच एका चित्रपटातही दिसणार आहे त्या चित्रपटाचं नाव आहे “या गावच कि त्या गावच”. आयुषी भावे हि एक उत्तम डान्सर असल्याने तिचा चाहतावर्ग देखील खूप मोठा आहे.
