मुलीचा बाप झालो असे म्हणत अभिनेता सुहृद वर्डेकर याने ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. सुहृद वर्डेकर हा मराठी मालिका अभिनेता आणि दिग्दर्शक आहे. ‘असावा सुंदर स्वप्नांचा बंगला’ या मालिकेतून सुहृदने छोट्या पडद्यावर आगमन केले होते. या मालिकेत तो प्रमुख नायकाच्या भूमिकेत पाहायला मिळाला. या मालिकेत येण्याअगोदर सुहृदने रेडिओ जॉकी म्हणून लोकप्रियता मिळवली होती इथूनच त्याला अभिनयाची खरी संधी मिळाली होती. रेडिओ जॉकी करता करता अनेक मराठी कलाकारांशी त्याची ओळख झाली.

या ओळखीमुळे सुहृदला अभिनयाची गोडी निर्माण झाली. त्यामुळे मालिकेत काम करत असताना त्याला फारसे दडपण आले नाही. एक घर मंतलेलं, दाह- एक मर्मस्पर्शी कथा या काही मालिकेतून तो झळकला आहे. एक घर मंतरलेलं या मालिकेत सुयश टिळक आणि सुरुची आडरकर यांच्यासोबत त्याला महत्वाची भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती. गोव्याच्या किनाऱ्यावर…. ह्या गाण्याला युट्युबवर अनेक हिट मिळाले आहेत. या गाण्यामुळे सुहृद वर्डेकर आणि सिद्धी पाटणे यांना तुफान प्रसिद्धी मिळाली होती. ह्या गाण्याचे दिग्दर्शन देखील सुहृदनेच केले होते. गोव्याच्या किनाऱ्यावर या गाण्याच्या हिट नंतर सुहृद आणि सिद्धी पाटणे यांनी अनेक व्हिडीओ सॉंग एकत्रित साकारले होते. भास तुझा…, प्रथम नमो…या त्याच्या व्हिडीओ सॉंगला देखील प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. २९ जानेवारी २०२० रोजी सुहृद वर्डेकर हा प्राची खडतकर हिच्यासोबत विवाहबद्ध झाला होता. कालच त्याने सोशल मीडियावरून आपण एका मुलीचा बाप झालो असल्याचे चाहत्यांना कळवले आहे. त्याच्या या बातमीवर मराठी सृष्टीतील कलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत. सुहृद आणि प्राची वर्डेकर यांचे कन्यारत्न प्राप्ती बद्दल अभिनंदन…