Breaking News
Home / जरा हटके / दिवंगत अभिनेते सुहास भालेकर यांच्या नातवंडांनी करिअर म्हणून निवडले हे क्षेत्र

दिवंगत अभिनेते सुहास भालेकर यांच्या नातवंडांनी करिअर म्हणून निवडले हे क्षेत्र

दिवंगत अभिनेते सुहास भालेकर यांनी विनोदी तसेच खलनायकी ढंगाच्या भूमिका गाजवल्या आहेत. ज्या काळात अभिनय क्षेत्र हे तुच्छ मानले जायचे त्या काळात सुहास भालेकर यांनी रंगभूमीवर पहिलं पाऊल टाकलं होतं. वडिलांचा विरोध असूनही केवळ आईने दिलेल्या प्रोत्साहणामुळेच ते या क्षेत्रात स्थिरावलेले पाहायला मिळाले. शाहीर साबळे यांच्या कडे त्यांनी अनेक लोकनाट्याचे दिग्दर्शन केले होते.अगदी शाहीर साबळेंपासून ते विजया मेहता आणि व्ही शांताराम पासून महेश मांजरेकर यांच्यासोबत काम करण्याचा त्यांना योग आला. बारीक अंगकाठी असल्याने सुरुवातीला त्यांच्या वाट्याला बहुतेकदा विनोदीच भूमिका आल्या. व्ही शांताराम यांच्या चाणी चित्रपटातून त्यांनी मोठ्या पडद्यावर पाऊल टाकले.

Nachiket Bhalekar
Nachiket Bhalekar

आतून कीर्तन वरून तमाशा, कशी काय वाट चुकलात, कोंडू हवालदार, बापाचा बाप अशा नाटकातून, लोकनाट्यातून त्यांनी कधी अभिनय तर कधी दिग्दर्शकाची भूमिका बजावली. बाळाचे बाप ब्रह्मचारी, दोन बायका फजिती ऐका, झुंज, सुशीला, शक, गहराई अशा हिंदी मराठी चित्रपटातून त्यांनी विविधांगी भूमिका साकारलेल्या पाहायला मिळाल्या. गोट्या, असंभव, भाकरी आणि फुल, वहिनीसाहेब अशा मालिका देखील त्यांनी आपल्या अभिनयाने गाजवल्या. असंभव मालिकेत त्यांनी साकारलेली सोपनकाकाची भूमिका प्रेक्षक आजही विसरलेले नाहीत. वयाच्या ८० व्या वर्षी देखील ते मालिकेतून उत्स्फूर्तपणे सक्रिय झालेले पाहायला मिळाले होते. २ मार्च २०१३ साली फुफ्फुसाच्या आजाराने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांचा मुलगा म्हणजेच हेमंत भालेकर हे देखील अभिनय क्षेत्र दाखल झाले. निनाद या नाट्यसंस्थेशी ते जोडले गेले. इथूनच त्यांचा रंगभूमीवरचा प्रवास सुरु झाला.

nachiket and harsh bhalekar
nachiket and harsh bhalekar

मालिका मधूनही त्यांनी अभिनय साकारला आहे. संसारगाथा, पाहुणा, अथांग, अधांतर, हसण्यावारी घेऊ नका अशा नाटक चित्रपटातून त्यांनी कधी दिग्दर्शन तसेच अभिनेता म्हणून काम केले आहे. सुहास भालेकर यांची दोन्ही नातवंड अभिनय क्षेत्रात न येता समुद्रावर स्वार होऊन देश विदेशी मुशाफिरी करत आहेत. नचिकेत आणि हर्ष हे दोघेही मर्चंट नेव्हीमध्ये आपले करिअर करत आहेत. करिअर म्हणून एक वेगळे क्षेत्र निवडल्याबद्दल आणि या क्षेत्रात येण्याचे धाडस दाखवल्याबद्दल हेमंत भालेकर यांना आपल्या मुलांचा सार्थ अभिमान वाटतो.

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published.