१६ नोव्हेंबर १९२७ रोजी डॉ श्रीराम लागू यांचा सातारा येथे जन्म झाला होता. मात्र त्यांनी आपले शिक्षण पुण्यातूनच घेतले होते. एमबीबीएस आणि एमएस ही डॉक्टरकीची पदवी त्यांनी प्राप्त केली होती पुढील शिक्षणासाठी त्यांनी परदेशवारी देखील केली. पुण्यातील बी जे मेडिकल कॉलेजमध्ये शिकत असताना डॉ श्रीराम लागू रंगभूमीशी जोडले गेले. मराठी, हिंदी, गुजराथी अशा तिन्ही भाषेतून त्यांनी नाटकात काम केले. नटसम्राट हे नाटक खूपच लोकप्रिय ठरलं होतं त्यातील त्यांच्या भूमिकेचे खूप कौतुकही झाले.

घरोन्दा, लावारीस, मुकद्दर का सिकंदर, हेराफेरी या हिंदी चित्रपटा सोबतच पिंजरा, फटाकडी, सामना, सिंहासन, भिंगरी अशा दर्जेदार चित्रपटात त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या. घरोन्दा या चित्रपटातील त्यांच्या सहाय्यक भूमिकेला उत्कृष्ट अभिनयाचा फिल्फेअर पुरस्कार देण्यात आला. १५० हुन अधिक हिंदी मराठी चित्रपट गाजवणाऱ्या श्रीराम लागू यांनी वयोपरत्वे कुठेतरी थांबण्याचे ठरवले. आपल्या अखेरच्या दिवसात प्रकृती अस्वास्थ्यामुळे १७ डिसेंबर २०१९ रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला. डॉ श्रीराम लागू यांच्या पत्नी दीपा लागू या देखील मराठी हिंदी सृष्टीतील अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी देखील अनेक दर्जेदार नाटकातून आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. वेलकम होम, एक पल, हा भारत माझा, थोडासा रुमानी हो जाये, निताल या त्यांनी साकारलेल्या काही चित्रपटांची नावे आहेत. दीपा लागू आणि श्रीराम लागू यांना तन्वीर हा मुलगा होता. परंतु एका दुर्घटनेत त्याला आपले प्राण गमवावे लागले होते. ९ डिसेंबर १९७१ हा तन्वीरचा जन्मदिवस होय. काही कामानिमित्त तो पुण्याहून मुंबईला ट्रेनने जात होता.

अभिनेते श्रीराम लागू ह्यांचा मुलगा तन्वीर हा पुण्याहून मुंबईला ट्रेनने जात असताना तो ट्रेनच्या खिडकीपाशी बसलेला तन्वीर ट्रेनमध्ये आपल्या जवळील पुस्तक वाचत असताना बाहेरून फेकलेला दगड अचानक त्याच्या डोक्यावर जोरदार आदळला. दगडाच्या या जोरदार आघातामुळे तन्वीर खाली पडला काही दिवस कोमात गेला होता. उपचारासाठी त्याला ताबडतोब दवाखान्यात दाखल केले होते मात्र आठवड्याभरातच त्याचे निधन झाले. तन्वीच्या स्मृतिप्रीत्यर्थ ९ डिसेंबर रोजी दीपा लागू आणि श्रीराम लागू यांनी २००४ सालापासून तन्वीर नाट्यकर्मी पुरस्कार देण्याचे ठरवले. त्यांच्या रुपवेध या संस्थेमार्फत हा पुरस्कार नाट्यकर्मीना देण्यात येत आहे. ट्रेनमध्ये दगड फेकणार्यांना फक्त त्यांच्या मजेपोटी इतरांवर किती मोठं संकट येऊ शकत ह्याची जण त्यांना नसते.