बॉलिवूड कलाकार त्यांची लग्न आणि घटस्फोट या खूप सामान्य गोष्टी झाल्या आहेत. मराठी सिनेसृष्टीत पाहील तर खूप कमी असे कलाकार सापडतील ज्यांनी लग्नानंतर काही दिवसांतच घटस्फोट घेतला आहे. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून सिद्धार्थ जाधव याला अपवाद ठरत होता. त्याच आणि त्याच्या पत्नीचं जोरदार भांडण सुरू आहे. तसेच ते दोघे आता घटस्फोट घेणार आहेत अशा चर्चांचा सोशल मीडियावर महापूर आला होता. मात्र आता या सर्व चर्चांना सिद्धार्थने पूर्णविराम लावण्याचा प्रयत्न केला आहे. त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये त्याची पत्नी तृप्ती देखील दिसते आहे. नुकताच सिद्धार्थच्या मोठ्या मुलीचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

यावेळी त्याने आपल्या मुलीबरोबर काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. तसेच यामध्ये बर्थडे पार्टीला आलेल्या काही लहान मुलांबरोबर एक ग्रुप फोटो देखील काढला याच फोटोमध्ये त्याची पत्नी देखील आहे. त्याने हा फोटो शेअर करून एक प्रकारे त्याच्या घटस्फोटाच्या चर्चेला पूरणविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. अशात या आधी देखील तो त्याच्या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करत असताना मीडिया समोर आला होता. त्यावेळी त्याला त्याच्या घटस्फोटाबद्दल विचारण्यात आले होते. तेव्हा त्याने वैतागून उत्तर दिले होते की, “असं काही नाही आहे.” मात्र यावर तो स्पष्ट काही बोलला नव्हता. त्यामुळे त्याचे चाहते थोडे चिंतेत होते. त्यांचा घटस्फोट होऊ नये म्हणून अनेक जण त्याला सोशल मीडियावर मॅसेज करत होते. अशात या दोघांच्या घटस्फोटाची चर्चा नेमकी कधी पासून सुरू झाली हे पाहू…तर याच महिन्याच्या सुरुवातीला सिद्धार्थ आपल्या कुटुंबाला घेऊन दुबई येथे फिरायला गेला होता. त्यावेळी त्याने आपल्या मुलींबरोबर खूप मज्जा मस्ती केली. तसेच दोन्ही मुलींबरोबरचे काही फोटो देखील सोशल मीडियावर पोस्ट केले. अशात त्याने यावेळी पत्नी तृप्ती अक्कलवार बरोबर एकही फोटो पोस्ट केला नव्हता. तसेच तृप्तीने देखील फक्त मुलींबरोबर फोटो पोस्ट केले होते. सिद्धार्थ बरोबर तिचा एकही फोटो नव्हता.

याच वेळी या दोघांच्या घटस्फोटाची चर्चा सुरू झाली. त्यानंतर काही दिवसांनी तृप्तीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन सिद्धर्थच नाव देखील काढून टाकलं. तिने तृप्ती जाधव हे नाव काढून तृप्ती अक्कलवार हे नाव लिहिलं आहे. अशात हे समल्यवर या दोघांच्या घटस्फोटाची चर्चा आणखीनच रंगली. अनेक जण म्हणू लागले की, हे दोघे आता वेगळे राहत आहेत. तसेच ते घटस्फोट घेणार आहेत. मात्र आपल्यामुळे आपल्या मुलींवर याचा काही परिणाम होऊ नये म्हणून कदाचित ते दोघे मुलींबरोबर फिरत आहेत. त्यांच्याबरोबर वेळ घालवत आहेत. सुरू असलेल्या चर्चा पाहता याचा परिणाम सिद्धार्थच्या आगामी तमाशा लाईव्ह या चित्रपटावर होऊ शकतो. त्यामुळे कदाचित त्याने हा सर्व प्रकार शांत होण्यासाठी पत्नीबरोबरचा फोटो पोस्ट केला असावा असेही काही जण म्हणत आहेत. पण काही केलं तरी लोक बोलतातच त्यापेक्षा शांत बसून आपल्या कामावर लक्ष केंद्रित केलेलं कधीही चांगलं म्हणूनच सिद्धार्थने फोटो शेअर करून ह्या सर्व गोष्टीना पूर्ण विराम दिल्याचं दिसून येतंय.