कलाकारांचं पडदयावरच्या भूमिकांमधील आयुष्य आणि वैयक्तिक आयुष्य हे नेहमीच वेगळं असतं. पण कितीही म्हटलं तरी कलाकारांच्या खऱ्या आयुष्यात काय चाललय हे जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांना असते. काहीवेळा कलाकारच त्यांच्या वास्तव आयुष्यातील गोष्टी सोशल मीडियावर शेअर करतात तर काहीवेळा कलाकारांच्या सोशल मीडियावरील फोटोंमधून चाहते तर्क लावत असतात. सध्या हा मुद्दा चर्चेत आहे तो अभिनेता सिध्दार्थ जाधव याच्या आयुष्यात आलेल्या एका वादळामुळे. सिध्दार्थची पत्नी तृप्ती हिने तिच्या सोशल मीडिया हँडलचं नाव तृप्ती जाधव असं बदलून तृप्ती अक्कलवार असं केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून सिध्दार्थ आणि तृप्ती घटस्फोट घेणार असल्याची चर्चा सुरू होती. तृप्तीने सोशलमीडियावरून तिची सिध्दार्थच्या नावाची ओळख हटवल्यामुळे या चर्चेला अधिकच उधाण आलं आहे.

प्रचंड संघर्षानंतर अभिनयक्षेत्रात नावारूपाला आलेल्या सिध्दार्थ जाधवने मराठी आणि हिंदी मनोरंजनसृष्टीत एक स्थान निर्माण केलं आहे. सिध्दार्थ आणि तृप्ती या जोडीनेही इथंपर्यंत पोहोचण्यासाठी खूप कष्ट घेतले आहेत. सिध्दार्थला स्वरा आणि इरा या दोन मुली आहेत. पण गेल्या दोन वर्षापासून सिध्दू आणि तृप्ती त्यांच्यात काहीतरी बिनसल्याची चर्चा आहे. गेली दोन वर्षे सिध्दार्थ आणि तृप्ती एकमेकांपासून वेगळे राहत असल्याचं बोललं जातंय. काही दिवसांपूर्वी सिध्दार्थने त्याच्या दुबई ट्रीपचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोंमध्ये तो दुबईमध्ये फॅमिलीसोबत मजा करत असल्याचे दिसले. या ट्रीपमध्ये सिध्दार्थसोबत त्याच्या मुली आणि तृप्तीही होती, पण सिध्दूने जे फोटो शेअर केले ते फक्त मुलींसोबतचे होते. एकाही फोटोमध्ये त्याच्यासोबत तृप्ती दिसली नाही. तेव्हाच नेटकऱ्यांनी सिध्दार्थ आणि तृप्ती यांच्या नात्यात अंतर आलं आहे का अशी शंका व्यक्त केली होती. पण यावर सिध्दार्थ किंवा तृप्ती यांनी काहीच भाष्य केलं नव्हतं. अजूनही सिध्दू आणि तृप्ती यांनी त्यांचा घटस्फोट झालाय किंवा त्यांच्यात काही मतभेद आहेत याविषयी विधान केलेलं नाही. पण दुसरीकडे सिद्धार्थच्या पत्नीने देखील दुबईचे फोटो शेअर केले आहेत आणि सिद्धार्थ मुलींसोबत ज्या पिंक कलरच्या कर सोबत फोटो काढलेत त्याच कारमध्ये सिद्धार्थच्या पत्नीनेही व्हिडिओ आणि फोटो काढून शेअर केले आहेत. पण ह्या दोघांचे एकत्रित फोटो नसल्याने ह्यांच्यात मतभेद निर्माण झाल्याची शंका निर्माण केली गेली. एकीकडे सिध्दार्थच्या वैवाहिक आयुष्यात वादळ आल्याची चर्चा सुरू असताना तृप्तीच्या सोशलमीडियावरील बदललेल्या आडनावाने पुन्हा एकदा शंका निर्माण झाल्या आहेत.

तृप्ती तिच्या सोशल मीडियावर तृप्ती जाधव असं नाव लावत होती, पण नुकतंच तिने तृप्ती अक्कलवार असा बदल केला आहे. सिध्दार्थसोबत आधीच गेल्या दोन वर्षापासून ती राहत नाहीय, त्यात आता तिने सोशलमीडियावरील नावातून जाधव या आडनावाला हटवल्याने खरच ते एकमेकांपासून वेगळे होणार आहेत का असा प्रश्न सिध्दार्थच्या चाहत्यांच्या मनात निर्माण झाला आहे. सिध्दार्थ सध्या दे धक्का या सिनेमाच्या सिक्वेलच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. काही दिवसांपूर्वी त्याने हे तर कायच नाय हा शो सुरू केला होता, मात्र या शोला फारसा प्रतिसाद न मिळाल्याने तो बंद झाला. आजपर्यंत सिध्दार्थने अनेक मराठी आणि हिंदी सिनेमात काम केलं आहे. इतकच नव्हे तर सिध्दार्थ आणि तृप्ती यांनी एकत्र झलक दिखला जा या डान्स रिअॅलिटी शोमध्येही भाग घेतला होता. एक आनंदी कुटुंब अशी सिध्दार्थच्या फॅमिलीची ओळख होती, त्यामुळे सिध्दार्थ आणि तृप्ती यांच्यात सध्या नेमंक काय सुरू आहे हे जोपर्यंत त्यांच्याकडून समोर येत नाही तोपर्यंत चाहत्यांना वाट पहावी लागेल