Breaking News
Home / जरा हटके / मुंबईत प्रथमच घेतलं घर आयुष्याची नवी सुरवात म्हणत अभिनेत्री मितालीने शेअर केला फोटो

मुंबईत प्रथमच घेतलं घर आयुष्याची नवी सुरवात म्हणत अभिनेत्री मितालीने शेअर केला फोटो

मराठी मनोरंजन विश्वातील एव्हरग्रीन जोडय़ांपैकी एक असलेल्या सिध्दार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांच्या सोशलमीडिया पेजवर ते कोणता नवा व्हिडिओ किंवा पोस्ट शेअर करतात याकडे त्यांच्या चाहत्यांचे नेहमीच लक्ष असते. एका इव्हेंटमध्ये ओळख, त्यातून मैत्री आणि त्यानंतर प्रेमात पडलेल्या या जोडीने गेल्या वर्षी पुण्याच्या ढेपेवाडय़ात डेस्टिनेशन वेडिंग केले. सिध्दार्थ आणि मिताली यांची रोजची तूतूमैमै असो किंवा त्यांच्या भटकंतीचे फोटो असोत, चाहत्यांशी ते त्यांची प्रत्ये गोष्ट शेअर करत असतात. नुकतीच त्यांनी त्यांच्या आयुष्यातील एक गोड बातमी एकत्र पोस्ट केली आहे.

actor siddhath sith mitali
actor siddhath with mitali

त्यांच्या या बातमीवर कमेंटमध्ये अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे. पण ही गोड बातमी म्हणजे दुसरीतिसरी काही नसून मुंबईत या दोघांनी नवं घर घेतले असून हीच आनंदाची बातमी त्यांनी चाहत्यांना दिली आहे. दोघांनीही त्यांच्या इन्स्टापेजवर हाताच्या अंगठय़ाला शाई लावलेला फोटो शेअर करत एक नवी सुरूवात…. मुंबईत साकारलं आमचे नवे घर अशी कॅप्शन दिली आहे. दोन वर्षे रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर या दोघांनी लग्न केले. कामाच्या निमित्ताने गोरेगावमध्ये ही जोडी रेंटच्या घरात राहत होती. लग्नानंतर स्वत:चे घर घेण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले. अखेर त्यांचे हे स्वप्न पूर्ण झाले. या दोघांनी नवे घर मुंबईतील कोणत्या भागात खरेदी केले आहे हे अदय़ाप त्यांनी सांगितलेले नाही. पण घर खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाल्याचे त्यांनी शाई लावलेल्या अंगठय़ाच्या फोटोतून दाखवून दिले आहे. सध्या तरी नव्या घराचा आनंद या जोडीच्या चेहरयावर झळकत आहे. विशेष म्हणजे सिध्दार्थ आणि मिताली हे एकमेकांना टायनीपांडे अशी हाक मारतात. त्यांच्या प्रत्येक पोस्टमध्ये हे नाव हॅशटॅग केलेले असते.

actress mitali mayekar
actress mitali mayekar

त्यामुळे नव्या घराच्या पोस्टमध्येही त्यांनी हे युनिक नाव टॅग केले आहे. सिध्दार्थ आणि मिताली दोघेही गेल्या अनेक वर्षापासून अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत. सिध्दार्थ मूळचा पुण्याचा असून त्याने झेंडा या सिनेमातून मोठय़ा पडदय़ावर आगमन केलं. तर अग्निहोत्र या मालिकेतून त्याने टीव्हीवर पदार्पण केले. दोन महिन्यांपूर्वीच सिध्दार्थची भूमिका असलेली सांग तू आहेस का ही मालिका गाजली होती. तर झिम्मा या सिनेमातील सिध्दार्थच्या अभिनयाचे कौतुक झाले. मूळची मुंबईची असलेल्या मितालीने यापूर्वी उर्फी या सिनेमात काम केले आहे. फ्रेशर्स या मालिकेतून तिने टीव्हीवर पदार्पण केले. तर सुयश टिळकसोबत ती हॅशटॅग प्रेम या सिनेमात दिसली. लाडाची मी लेक गं या मालिकेतही मितालीचा अभिनय पहायला मिळाली.

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *