जरा हटके

श्रेयस तळपदेच्या मुलीची भूमिका साकारणार ही बालकलाकार ऐश्वर्या राय सोबत केलं आहे काम

श्रेयस तळपदेने त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी आपल्या आगामी चित्रपटाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. बऱ्याच कालावधीनंतर श्रेयस तळपदे मराठी सृष्टीकडे वळलेला पाहायला मिळाला. त्याने साकारलेली माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका प्रेक्षकांची विशेष दाद मिळवताना दिसत आहे. लवकरच श्रेयस ‘आपडी थापडी ‘ या चित्रपटातुन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतेच या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू करण्यात आले आहे. या चित्रपटात श्रेयस तळपदे सोबत अभिनेत्री मुक्ता बर्वे मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

katrina kaif with khushi hajare
katrina kaif with khushi hajare

हे दोघेही दमदार कलाकार आपडी थापडी या कौटुंबिक जीवनावर आधारित चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. चित्रपटाचा पहिला प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या समोर आला आहे यात संदीप पाठक, नंदू माधव, नवीन प्रभाकर हे कलाकारसुद्धा महत्वाची बजावताना दिसणार आहेत. आपडी थापडी या चित्रपटात आणखी एक बालकलाकार झळकणार आहे जी मुक्ता बर्वे आणि श्रेयस तळपदे यांच्या मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. ही चिमुरडी आहे “खुशी हजारे”. खुशी हजारे ही बॉलिवूड चित्रपटातली बालकलाकार आहे. विकी कौशल सोबत ‘भूत’ , ऐश्वर्या रायसोबत ‘सजबजीत’, खानदानी शफाखाना असे बॉलिवूडचे चित्रपट खुशीने बालकलाकार म्हणून अभिनित केले आहेत. तसेच वजनदार आणि प्रवास या मराठी चित्रपटात देखील ती झळकली आहे. आपडी थापडी या आणखी एका मराठी चित्रपटातून खुशीला अभिनयाची संधी मिळत आहे. श्रेयस तळपदे आणि मुक्ता बर्वे यांच्यासोबत ती स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

actress aishwarya rai with khushi hajare
actress aishwarya rai with khushi hajare

चित्रपटासोबतच खुशीने टीव्ही जाहिरात क्षेत्रात देखील काम केलं आहे. खूप लहान असतानाच खुशीने पॅम्पर्स पॅन्टच्या ऍडमध्ये काम केले होते ही तिची पहिली ऍड ठरली होती. गोल्डी गुलाबजाम, लेन्सकार्ट तसेच नुकतीच ब्रिटनिया गुडडे ची एक नवी ऍड टीव्हीवर पाहायला मिळाली या ऍडमध्ये खुशी देखील झळकली आहे. त्यामुळे खुशी एक बालकलाकार म्हणून बॉलिवूड तसेच मराठी सृष्टीत चांगलीच ओळखली जाऊ लागली आहे. आपडी थापडी या चित्रपटानिमित्त खुशी हजारे हिला खूप खूप शुभेच्छा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button