जरा हटके

‘नवा गडी नवं राज्य’ मालिकेत या प्रसिद्ध अभिनेत्याची एन्ट्री.. मालिकेत येणार नवं वळण

नवा गडी नवं राज्य मालिका सुरावतीपासूनच प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. मालिकेतील आनंदीच्या भूमिकेत अभिनेत्री पल्लवी पाटील पाहायला मिळते तिच्या अभिनयाने मालिका पाहायला वेगळा रंग येतो. अनिता दाते, कश्यप परुळेकर, वर्षा दांदळे, कीर्ती पेंढारकर ह्यांच्या अभिनयामुळे प्रेक्षकांना मालिका पाहायला आवडते. मालिकेत वर्षा ह्या पात्राच्या आयुष्यात तिला खूपच अडचणींचा सामना करताना पाहायला मिळाली. पण आता तिच्यासाठी मालिकेत एका नव्या पात्राची एंट्री करण्यात आली आहे. “शिवानंद गावडे” उर्फ “नंदू” हे पात्र आजपासून मालिकेत पाहायला मिळत आहे. नंदू साकारणाऱ्या अभिनेत्याचं नाव आहे “शेखर फडके”.

nava gadi nava rajya nandu
nava gadi nava rajya nandu

“शिवानंद गावडे” उर्फ “नंदू” हा वर्षा हिच्या कॉलेजमध्ये एकत्र शिकत असल्याचं तिने सांगितलं आहे. नंदू हा आनंदी कडून गुडीपाडव्याच्या गुड्यांची ऑर्डर मिळवताना दाखवलं आहे इथेच वर्ष आणि नंदू ह्यांची पुन्हा भेट होते. शेखर फडके नंदू हे पात्र उत्तम निभावताना पाहायला मिळत आहेत. अगदी बालपणापासूनच तो उत्तम अभिनय करताना पाहायला मिळतो. आई पाहिजे चित्रपटात पहिल्यांदा शेखरला खलनायक साकारण्याची संधी मिळाली आणि अशाच भूमिकांची गोडी त्याच्यात निर्माण होत गेली. पाचवीत असताना त्याने रायगडाला जेव्हा जाग येते नाटकात बालपणीचे राजाराम साकारले होते. मग इथूनच अभिनयाला खरी सुरुवात झाली भांडुपच्या विद्यामंदिर शाळेत शिकत असताना शाळेचे मुख्याध्यापक विश्वासराव धुमाळ हे लेखक दिग्दर्शक होते. त्यांच्या प्रोत्साहनाने कुमार कला केंद्रात बक्षीस मिळाले. सातवीत असताना आई पाहिजे चित्रपटात अभिनेते रमेश भाटकर यांच्या बालपणीची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. ही भूमिका छोटीशी जरी असली तरी खलनायक साकारायची आवड इथूनच त्याच्यात निर्माण झाली. त्यानंतर खलनायकी ढंगाच्या भूमिकेनी त्याची पाठ सोडली नाही विठू माऊली मालिका असो वा सरस्वती मालिका यातून त्याने साकारलेला खलनायक काहीशा विनोदी वलयाचा दिसला.

actor shekhar phadke
actor shekhar phadke

सरस्वती मधला भिकुमामा तर त्याने अतिशय सुरेख रंगवलेला पहायला मिळाला होता. एकदा तर विठू माऊलीच्या सेटवर असताना ‘पुंडलिकाला का त्रास देतोस’ म्हणून एका आजीने शेखरला काठीने चांगलाच चोप दिला होता त्याच्या विरोधी अभिनयातून प्रेक्षकांना राग येणे हीच तर त्या कलाकारासाठी एक मोठी पावती ठरत असते. शेखरच्या बाबतीतही तेच घडले असे म्हणायला हरकत नाही. खलनायकासोबतच त्याने अनेकदा विनोदी भूमिका देखील रंगवल्या आहेत. त्याचे हे दोन्ही पैलू उत्कृष्ट अभिनयाची जाण करून देतात. स्टार प्रवाहवरील फुलाला सुगंध मातीचा या मालिकेतून तो किरणच्या भूमिकेत दिसला. ‘नवा गडी नवं राज्य’ मालिकेत आता हे वेगळं पात्र साकारायची त्याला संधी मिळाली आहे. ‘नवा गडी नवं राज्य’ मालिकेसाठी अभिनेता शेखर फडके याना खूप खूप शुभेच्छा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button