Breaking News
Home / जरा हटके / शशांक म्हणतो कुणाचं सरकार आहे चिन्ह कुणाकडे जाणार पक्षाचं नाव कुणाकडे राहणार यापेक्षा लोकांना सुविधा द्या

शशांक म्हणतो कुणाचं सरकार आहे चिन्ह कुणाकडे जाणार पक्षाचं नाव कुणाकडे राहणार यापेक्षा लोकांना सुविधा द्या

सेलिब्रिटी कलाकारांच्या स्टाइल्स, त्यांच्या फॅशन लोक नेहमीच फॉलो करत असतात. कलाकारांचा प्रभाव समाजातील लोकांवर इतका असतो की मग समाजातील जागृती करणाऱ्या योजनांसाठी सरकारला याच कलाकारांची मदत घ्यावी लागत असते. पण कलाकार काही फक्त सरकारी योजनांचा प्रसार करण्यासाठीच त्यांची प्रसिध्दी वापरत नाहीत तर समाजातील चुकीच्या गोष्टींवर स्वत:हूनही भाष्य करत असतात. याच पंक्तीत अभिनेता शशांक केतकरचाही पुढाकार असतो. काही दिवसांपूर्वी अमेरिकेत १५ ऑगस्टला भारतीय ध्वज न लावल्याबद्दल शशांकने व्हिडिओतून लक्ष वेधलं होतं. आता शशांकने थेट महाराष्ट्राच्या सरकारवर निशाणा साधला आहे.

actor shashank ketkar on road
actor shashank ketkar on road

पक्षाचं नाव आणि चिन्ह यासाठी भांडणाऱ्यांना रस्त्यांची अवस्था बघून लाज वाटली पाहिजे असं म्हणत शशांकने लोकांच्या भावना मांडल्या आहेत. शशांकनं एक व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओत त्यानं मालाड परिसरातील रस्त्यांची बिकट अवस्था दाखण्याचा प्रयत्न केला आहे. राजकारण बाजूला ठेवून साध्या साध्या गोष्टींकडं राजकारण्यांनी ज्यांना जनतेनं निवडून दिलं आहे, त्यांनी लक्ष द्यायला हवं, असं शशांक म्हणतोय. रहदारीच्या ,महत्त्वांच्या रस्त्यांची अशी अवस्था आहे, याला जबाबदार कोण? असा प्रश्न त्यानं विचारला आहे. अशा रस्त्यांवरून गाडी चालवणाऱ्याच्या महागड्या गाड्या खराब होत आहेत, नागरिंकाना नाहक भुर्दंड सहन करावा लागतोय, असं शशांकनं म्हटलंय. शशांकने सध्याच्या राजकीय नेतृत्वाचीही चांगलीच खरडपट्टी केली आहे. व्हिडिओबरोबरच शशांकनं एक पोस्टही शेअर केली आहे. महत्त्वाचे पाच मुद्दे त्यानं या पोस्टमध्ये मांडले आहेत. तू मूळचा पुण्याचा आहेस… तिथल्या रस्त्यांची काळजी कर तू. आम्हाला नको अक्कल शिकवू वगैरे म्हणणार्‍या लोकांनी यातल्याच एका खड्ड्यात जीव द्या असं या पोस्टमध्ये शशांक लिहितोय. तर हा व्हिडिओ मुळात कोणाच्या तरी सपोर्टसाठी आणि कोणाला तरी विरोध म्हणून केलेला नाही. हे प्रश्न जनतेचे आहेत आणि ते फक्त एका शहरा पुरते मर्यादित नाहीत.

shashank ketkar actor
shashank ketkar actor

हे देशातल्या सगळ्या रस्त्यांबद्दल माझं म्हणण आहे असा मुद्दा शशांकने मांडला आहे. अश्या खराब रस्त्यामुळे लोकांना मनस्ताप सहन करावा लागतो शिवाय मणक्याचे आजार, पाठदुखी अश्या लोकांना ह्यामुळेच खूपच त्रास होताना पाहायला मिळतो. रस्त्याच्या अश्या दुरावस्तेमुळे अपघात देखील घडतात. रस्त्याच्या या अवस्थेला जबाबदार असलेल्यांनी एकदा लोकांच्या मनाचा विचार करावा असं म्हणत शशांकने नेत्यांवर निशाणा साधलाय. नागरिकांनीही सुविधांचा वापर चांगल्याप्रकारे करावा आणि ही चळवळ चालवण्यासाठी आपापल्या भागातील रस्त्यांचे व्हिडिओ शेअर करण्याचं आवाहनही शशांकनं केलं आहे. त्यासाठी ये नही चलेगा हा हॅशटॅगही त्याने केला आहे. सध्या मुरांबा या मालिकेतील अक्षयच्या भूमिकेमुळे चर्चेत असलेला शशांक त्याच्या या व्हिडिओमुळे घराघरात पोहोचला आहे. त्याला कलाकारांचेही पाठबळ मिळत आहे आणि सर्वसामान्य लोकांनीही त्याला प्रतिसाद दिला आहे.

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published.