जरा हटके

लहानपणी बोबडं बोलायचा म्हणून शाळेला दांडी मोठा झाल्यावर कर्जाचा डोंगर मग हे ३ नियम पाळले आणि जीवन पालटून गेलं

बाहुबली या लोकप्रिय चित्रपटातील प्रभासच्या आवाजाला डब केल्यामुळे मराठमोळा अभिनेता शरद केळकर रातोरात लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊन पोहोचला. लई भारी चित्रपटातील त्याने साकारलेली संग्रामची विरोधी भूमिका मराठी प्रेक्षकांना तर विशेष भावली होती. यशाचा हा प्रवास अनुभवत असताना एका मुलाखतीत त्याने एकेकाळी आर्थिक अडचणींमुळे खायलाही पुरेसे पैसे नव्हते याचा खुलासा केला होता त्यावेळी शरद म्हणाला होता की, मी मुंबईत सुरुवातीला जिम ट्रेनर म्हणून काम करत होतो. त्यादरम्यान माझ्या डोक्यावर मोठं कर्ज होत.

actor sharad kelkar
actor sharad kelkar

बँक बॅलन्स देखील झिरो झाला होता हे कर्ज कसं फेडायचं हा मोठा प्रश्न सतत त्याच्या मनात घोंगावत होता. आज एवढे चांगले कपडे घालून केसांची स्टाईल मारून नटून मी तुमच्यासमोर येतो पण त्यामागं खूप कष्ट करावे लागले हे तो आवर्जून सांगतो. लहानपणी शरद बोबडं बोलायचा त्यामुळे आजूबाजूची मित्र मंडळी चिडवायची, शाळेत देखील गेल्यावर चेष्टा मस्करी करायची त्यामुळे अनेकदा शाळेला दांडी मारावी लागायची. असे असले तरी प्रचंड ईच्छा शक्तीच्या जोरावर या सर्व गोष्टींवर मात करत आणि ह्या सर्व उणिवा बाजूला सारत आज मी ह्या यशापर्यंत पोहोचलो आहे, आणि आज एक डब आर्टिस्ट म्हणून याच आवाजावर अनेकजण फिदा आहेत असे तो म्हणतो. दिसायला फिट अँड हँडसम असलेल्या शरद केळकरने अभिनय क्षेत्रात येण्याअगोदर ग्रासिम मिस्टर इंडिया या स्पर्धेत सहभाग दर्शवला होता त्यात त्याने फायनिस्टपर्यंत मजल मारली होती. यातूनच त्याला दूरदर्शनवरील आक्रोश या हिंदी मालिकेत काम मिळाले. सिंदूर तेरे नाम का, कुछ तो लोग कहेंगे यांसारख्या टीव्ही मालिकांमध्ये झळकल्यानंतर त्याने आपली पाऊले बॉलिवूड सृष्टीकडे वळवली. रॉकी हँडसम, हलचल, 1920 रिटर्न्स, राम लीला आणि लक्ष्मी यांसारख्या चित्रपटांमधील अभिनयासाठी त्याचं मोठं कौतुक केलं गेलं.

sharad kelakr with wife keerti
sharad kelakr with wife keerti

आयुष्य बदलण्यात माझ्यात मी केलेले बदल खूप फायद्याचे ठरले असं बोलताना तो म्हणाला “पहिलं म्हणजे जे काही करतोय ते तोंड लपवूनआणि त्यापासून दूर जायचं नाही. दुसरं म्हणजे जे करायचंय त्यासाठी खूप मेहनत घ्यायची. आणि तिसरी अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे तू हे करू शकणार नाहीस आहे त्यात समाधान मान असं म्हणणाऱ्यापासून आपण नेहमी चार हाथ लांब राहील पाहिजे. तुम्ही काय करू शकता हे तुम्हाला माहित आहे दुसऱ्याच मत ऐकून तुमच्या स्वप्नांना तोडू देऊ नका. नुकताच शरद केळकर ‘भुज: द प्राईड ऑफ इंडिया’मध्ये एक महत्त्वाची भूमिका साकारताना दिसला होता. लक्ष्मी, तानाजी या चित्रपटाने त्याच्या अभिनयाचे विविध पैलू उलगडले. चिनू, उत्तरायण, राक्षस, माधुरी, अ पेइंग घोस्ट, संघर्ष यात्रा यासारख्या मराठी चित्रपटात देखील त्याने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. आयुष्यात अनेक खस्ता खाल्ल्यानंतरही त्याच्यावर मात करत नव्या उमेदीने पुढे चालत राहिले की यशाचा मार्ग निश्चितच दिसतो असं शरद केळकर म्हणतो…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button