आज मराठी सृष्टीत २ लग्न पाहायला मिळाली. देवमाणूस फेम अभिनेता किरण गायकवाड, वैष्णवी कल्याणकर आणि शिवा मालिका अभिनेता शाल्व किंजवडेकर, श्रेया दफळापूरकर आज १४ डिसेंबर रोजी या एकाच दिवशी विवाहबद्ध झाली. किरण गायकवाड आणि वैष्णवी कल्याणकर यांचा सावंतवाडीत मोठ्या थाटात लग्नसोहळा पार पडला. तर शाल्व किंजवडेकर आणि श्रेयाचे पुण्याजवळ डेस्टिनेशन वेडिंग पार पडले. शाल्व किंजवडेकर याच्या लग्नात आज बरीचशी कलाकार मंडळी हजेरी लावताना दिसली होती.
अभिनेता सिद्धार्थ चांदेकर नव्या नवरीला म्हणजेच श्रेयाला लग्नमांडपात आणले. तर गायिका प्रियांका बर्वे हिच्या तीन वर्षांच्या मुलाने फुलांच्या पाकळ्या शाल्व आणि श्रेयाच्या बाजूने फेकल्या. सिद्धार्थ चांदेकर, मिताली मयेकर, अभिषेक देशमुख, कृतिका देव, प्रियांका बर्वे, रेवती लेले या सर्वांनी शाल्व आणि श्रेयाचे लग्न अटेंड केलं. पण यावेळी शिवा मालिकेचे कलाकार मात्र मिसिंग असलेले जाणवले. शाल्व किंजवडेकरची शिवा ही अभिनित केलेली दुसरी मराठी मालिका आहे. याअगोदर तो येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेत मुख्य भूमिकेत दिसला होता. एक बालकलाकार म्हणून शाल्वने हिंदी सृष्टीत पाऊल टाकले होते. त्यानंतर तो माधुरी दिक्षितच्या बकेट लिस्ट मध्ये झळकला होता.
तर श्रेया दफळापूरकर ही फॅशन डिझायनर आहे. श्रेयाचा स्वतःचा कपड्यांचा ब्रँड देखील असून काही मालिका, चित्रपटासाठी तिने कॉस्टयुम डिझायनर म्हणून काम केलं आहे. या दोघांचा हा प्रेमविवाह आहे. काहीच महिन्यांपूर्वी त्यांनी साखरपुडा करून सगळ्यांना सुखद धक्का दिला होता. आज पार पडलेल्या लग्नावेळी मंगळसूत्र घालताना श्रेयाला थोडेसे भावुक व्हायला झाले. हे लग्न कशा पद्धतीने साजरं होतंय याची चाहते आतुरतेने वाट पाहून होते. आज अखेर १४ डिसेंबर रोजी त्यांच्या लग्नाचा हा थाट पाहून सगळेच खुश झाले आहेत. नांदा सौख्यभरे! म्हणत या नवविवाहित दाम्पत्याला प्रेक्षकांकडून शुभाशीर्वाद दिले जात आहेत.