तुम्हाला हे माहित आहे ? ‘सत्यवान सावित्री’ मालिकेतील जांभळ्या आणि करवंदया नक्की आहेत तरी कोण

झी मराठी वाहिनीवर ‘सत्यवान सावित्री’ ही पौराणिक मालिका प्रसारित केली जात आहे. या मालिकेत सावित्रीचा संघर्ष प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. वेदांगी कुलकर्णी आणि आदित्य दुर्वे हे कलाकार या मालिकेत मध्यवर्ती भूमिकेत पाहायला मिळत आहेत. तर सावित्रीच्या बालपणीची भूमिका राधा धारणे निभावत आहे. सत्यवान सावित्रीच्या बाललीला मालिकेतून पाहायला मिळत आहेत. राधा धारणे सोबत मालिकेत अनेक नव्या चेहऱ्यांना अभिनयाची संधी मिळवून देण्यात आली आहे. यातील जांभळ्या आणि करवंदया ही चिमुरडी पात्र प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. सवित्रीसोबत जांभळ्या आणि करवंद्याच्या करामती या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याने ही चिमुरडी कलाकार मंडळी कोण असा प्रश्न बहुतेकांना पडला आहे.

आज या चिमुरड्या कलाकारांबद्दल माहीत नसलेल्या काही खास गोष्टी जाणून घेऊयात…. राधा धारणे हिने आनंदी हे जग सारे या मालिकेतून बालपणीच्या आनंदीची भूमिका साकारली होती. आनंदी एक स्पेशल चाईल्ड असल्याने राधा ने ही भूमिका तिच्या अभिनयाने गाजवली होती. तर मालिकेतील जांभळ्या आणि करवंदयाची भूमिका सत्यजित होमकर आणि विश्वजित होमकर यांनी निभावली आहे. सत्यजित आणि विश्वजित हे दोघे जुळे भाऊ आहेत. आपल्या कुटुंबासोबत ते साताऱ्यात वास्तव्यास आहेत. सत्यजित आणि विश्वजितची आई राजश्री होमकर या वेलनेस कोच म्हणून काम करत आहेत. या दोघांना प्रजित हा मोठा भाऊ देखील आहे. सत्यजित आणि विश्वजित प्रथमच झी मराठीवरील मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. भिल्ल आदिवासी मुलं जांभळ्या आणि करवंदया ही पात्र ते साकारणार आहेत त्यामुळे त्यांच्यासाठी ही मालिका खूपच महत्वाची ठरली आहे. हे दोघेही भाऊ सातारा जिल्ह्यातील आप्पासाहेब भाऊराव पाटील रयत इंग्लिश मीडियम स्कुल मध्ये इयत्ता पाचवीच्या वर्गात शिकत आहेत.

सध्या शाळा एक महीना उशिरा भरणार आहेत त्यामुळे ही दोन्ही चिमुरडी निवांत आहेत मात्र शाळा सुरू झाल्यावर अभिनया सोबतच अभ्यासावर देखील ते दोघे लक्ष्य केंद्रीत करणार आहेत. यात त्यांना शाळेकडून देखील मोठा सपोर्ट मिळत आहे. अभिनयाची आवड असलेल्या सत्यजित आणि विश्वजित होमकर यांनी प्रवीण भारदे यांच्या नाट्यशाळेत सहभाग दर्शवला होता. इथूनच त्यांना नयना आपटे यांच्यासोबत व्यावसायिक नाटकातून झळकण्याची संधी मिळाली. सत्यवान सावित्री या मालिकेतून हे दोघे प्रथमच छोट्या पडद्यावर झळकणार आहेत. या भूमिकेसाठी सत्यजित आणि विश्वजित यांना अभिनय क्षेत्राच्या या प्रवासात भरघोस यश मिळो हीच एक सदिच्छा!.