
कलर्स मराठी वाहिनीवरील जीव माझा गुंतला या मालिकेतील मल्हार आणि अंतराची जोडी प्रेक्षकांना विशेष भावली आहे. सौरभ चौघुले याने या मालिकेत प्रथमच मुख्य नायकाची भूमिका साकारली आहे. मी मुख्य भूमिकेत दिसेल याचा सौरभने कधीच विचार केला नव्हता. या मालिकेअगोदर सौरभने दख्खनचा राजा ज्योतिबा मालिकेत विरोधी भूमिका साकारली होती. परंतु मल्हारच्या भूमिकेमुळे सौरभला अमाप लोकप्रियता मिळवून दिली. सौरभ चौघुले हा मूळचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातला. नाटक एकांकिका करत असताना त्याने आपली पाऊले मुंबईकडे वळवली. इथे आल्यावर त्याने मॉडेलिंग क्षेत्रात नशीब आजमावले. आर्थिक चणचण असल्याने त्याने सुरुवातीला फोटोग्राफी आणि सिनेमॅटोग्राफर म्हणून काम केले. हळूहळू जम बसू लागल्यावर त्याने सिरीज आणि शॉर्टफिल्म दिग्दर्शित केल्या.

मालिकेतून छोट्या मोठ्या भूमिका साकारत असतानाच त्याला जीव माझा गुंतला मालिकेत मल्हारची भूमिका मिळाली. सौरभ आणि त्याच्या बाबांचं बॉंडिंग थोडस हटके आहे. कारण गेल्या ३० वर्षात तो प्रथमच आपल्या बाबांसोबत हॉटेलमध्ये जेवायला गेला होता. हॉटेलमधील हा किस्सा सांगताना सौरभ आपल्या जुन्या आठवणीत रमला . बऱ्याच महिन्यांनी त्यांच्या शिव्या खायला मिळाल्याने सौरभ भांबावून गेला. बाबासोबतची ही आठवण सांगताना सौरभ म्हणतो की, महिन्यांनी भेटायला आले होते. 30 वर्षातून पहिल्यांदाच मी माझ्या बाबांना हॉटेलात घेऊन गेलो. म्हणजे मी स्वतः lounge मध्ये टेबल बुक करुन डिनर प्लान केला. शूट वरून घरी पोहोचे पर्यंत 10.30 झाले. त्यांना pick करून हॉटेल ला पोहोचल्यावर आम्हा दोघांना खूप awkward होत होतं. बोलायचं काय? Order द्यायची काय विचारल तर, “जास्त नको मी काही घेणार नाही.” मग शेवटी एक एक बियर आणि चिकन बिर्याणी ठरलं. त्यांच्यासाठी अश्या ठिकाणी पहिल्यांदाच होतं आणि मला त्यांच्यासोबत. 10 मिनिट दोघे काही बोललोच नाही. शेवटी मीच इकडचे तिकडचे विषय काढले. पण तेवढेच उत्तर आले. पुढे काय? परत तीच शांतता background ला गाणी वाजत होते. मग बाबांनी shooting बदल काही विचारल मग सगळ सांगीतल. खाणं आलं जेवता जेवता हळू हळू gossip करून झालो.

बिर्याणी मात्र उरली ती पार्सल घे म्हणाले Comfortable झालो रे झालो निघायची वेळ झाली बिल मी भरलं, शेवटी बाबा, विचारलच त्यांनी ,”किती झालं बिल? म्हंटलं, इतकं नाही !घरी जायला निघालो म्हणाले “उद्या पहाटेची बस आहे. शांतता होती… आपल्याला जास्तं बोलता आलं नाही म्हणून थोडं upset होतो. आता तर background ला गाणी पण नव्हती. मी म्हणालो, “ठीके मी सोडतो सकाळी. घर तसं जवळच होत. पण तितक्यात बाबा सुरू झाले ते पार घराच्या पसार्या पासून ते लग्ना पर्यंतचा विषय. ते मला ओरडत होते. मला हसू येत होतं. कारण अचानक awkwardness गायब झाला होता आणि बर्याच महिन्यांनी मी त्यांचा ओरडा खात होतो. सगळ घर आवरून ठेवलं सांगितल आणि ताकीद पण दिली. अचानक झालेल्या ह्या change over ने भांबावून गेलो होतो पण मज्जा येत होती. इतक्या महिन्यांनी शिव्या खावून बिर्याणी तर जिरली पण सोबत लग्न विषय कडून dessert ची हौस पण पूर्ण केली. घरी झोपताना स्वतःलाच म्हणालो, थोडा उशीर केलास सौरभ बाबांन बरोबर अस बाहेर हॉटेल ला जायचा. 30 वर्ष लागली. त्यांचा फोटो तर काढला पण सोबत फोटो घ्यायचा