
आजच्या घडीला सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवून मराठी सृष्टीत सहज स्थान मिळवता येत आहे. मात्र एक काळ असा होता ज्या काळात कलाकारांना मुंबई गाठून स्ट्रगल केल्याशिवाय पर्याय नव्हता. वेळप्रसंगी हातातील पैसे पाहून उपाशी पोटी झोपण्याचीही तयारी या कलाकारांनी दाखवून दिली होती. असाच काहीसा अनुभव मराठी सृष्टीतील देखणा कलाकार संतोष जुवेकर याने देखील घेतला आहे. केवळ आणि केवळ आईच्या आणि आजोबांच्या पाठिंब्यामुळेच संतोष आपल्या स्ट्रगलच्या काळात मुंबईत दाखल झाला होता. संतोषच्या वडिलांचा त्याच्या अभिनय क्षेत्रात जाण्याला भयंकर विरोध होता.

त्यामुळे ‘माझ्याकडून तुला काही पैसे मिळणार नाहीत’ हे त्यांनी अगोदरच स्पष्ट केले होते. मुंबईला जाताना आई जवळचे पैसे त्याला खर्चासाठी द्यायची. त्यामुळे हातात पुरेसे पैसे नसतानाही कधी कधी मित्राकडे तर कधी मावशीकडे तो जेवण करायचा. पण रोज रोज जेवायला कोण देणार याची जाणीव त्याला काही दिवसातच जाणीव झाली. म्हणून मग खार स्टेशनच्या बाहेर एका हातगाडीवर २० रुपयात जेवण मिळायचं. त्यामध्ये तीन पोळ्या, बटाट्याची भाजी, भात, लिंबाचं किंवा कैरीच लोणचं आणि मिरची कांदा असं पोटभर जेवण मिळायचं. अशा छोट्या मोठ्या अडचणींवर मात करत संतोषने मराठी सृष्टीत स्वतःचं स्थान निर्माण केलं. संतोष सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. आपल्या आईबद्दल तो नेहमीच भरभरून बोलताना तिच्यासोबतचे फोटो शेअर करताना तो कायम दिसतो मात्र आज फादर्स डे निमित्त प्रथमच संतोषने त्याच्या बाबांचा फोटो शेअर करून हटके अंदाजात शुभेच्छा दिलेल्या पाहायला मिळत आहेत. संतोषची ही पोस्ट सध्या सेलिब्रिटी विश्वात प्रचंड लोकप्रिय झाली आहे.

‘चायला आज बाबांचा दिवस आणि विसरलो, त्यांनीच call केला म्हणाले “अरे वेड… व्या आईला wish करतोस आणि मला विसरलास ? बाबा i love u.. सांगायची गरज आहेका??.. असं मी म्हंटल आणि ते म्हणाले… अरे माझ्या बाबाला मी नाही दाखवु शकलो जगाला पण तू दाखवु शकतोस ना तुझ्या बाबाला, कळूदे ना मग सगळ्यांना हा चिकना माल ह्या कंपनीचा आहे…माझा बाबा लय माझ्यावर गेलाय…बाबूडी i love u रे! Happy fathers day’ बाबांच्या अंगी असलेल्या निर्धास्तपणाचा गुण संतोषच्या पोस्टमधून कायमच दिसून येतो. संतोष जुवेकर नेहमीच आपल्या मनातल्या भावना अगदी बिनधास्तपणे मांडताना पाहायला मिळतो. आज fathers day निमिता संतोष जुवेकरने प्रथमच वडिलांचा फोटो सोशिअल मीडियावर शेअर करत अगदी हटके अंदाजात वडिलांवर पोस्ट लिहली आहे.