मराठी सृष्टीतील एक लाडका अभिनेता म्हणून संकर्षण कऱ्हाडेने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत त्याने साकारलेला समीर प्रेक्षकांना खूपच भावला आहे. त्यामुळे या मालिकेत मुख्य नायक नायिके इतकीच त्याचीही भूमिका तितकीच महत्वाची मानली जाते. गेल्या काही दिवसांपूर्वी संकर्षण आपल्या नाटकाच्या दौऱ्यानिमित्त लंडनला गेला होता. त्यामुळे त्याने काही दिवस मालिकेतून ब्रेक घेतला . नाटकाच्या दौऱ्याहून परत आल्यावर संकर्षण मालिकेत पुन्हा सक्रिय झाला. नुकतेच संकर्षणच्या मुलांची बर्थडे पार्टी साजरी करण्यात आली. २७ जून २०२१ रोजी संकर्षणला कन्यारत्न आणि पुत्ररत्न प्राप्ती झाली होती.

काल सोमवारी २७ जून रोजी त्याच्या या जुळ्या मुलांचा मोठ्या थाटात पहिला वाढदिवस साजरा करण्यात आला होता. चि. सर्वज्ञ संकर्षण कऱ्हाडे आणि कु. स्रग्वी संकर्षण कऱ्हाडे अशी त्याच्या दोन्ही मुलांची नावं आहेत. यावेळी पत्नी शलाका, संकर्षण आणि त्याच्या कुटुंबीयांनी अगोदरच संपूर्ण तयारी केली होती. या बर्थडे पार्टीला माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतील मायरा वायकुळ, काजल काटे, प्रार्थना बेहरे या कलाकारांनी आवर्जून हजेरी लावून सोहळ्याला मज्जा आणली. चिमुरड्यांसोबत मायराने या बर्थडे पार्टीत खूप धमालमस्ती अनुभवली. संकर्षणची दोन्ही मुलं सहा महिन्यांची झाली त्यावेळी त्याने या दोन्ही मुलांचे पाठमोरे असलेले फोटो शेअर केले होते मात्र वाढदिवसानिमित्ताने त्याच्या या दोन्ही मुलांचे फोटो प्रार्थना बेहरे आणि मायराने सोशल मीडियावर शेअर केलेले पाहायला मिळत आहेत. चि. सर्वज्ञ संकर्षण कऱ्हाडे आणि कु. स्रग्वी संकर्षण कऱ्हाडे या दोन्ही मुलांच्या नावाचा अर्थ खूपच खास आहे. सर्वज्ञ म्हणजे सर्व जाणनारा, ज्ञानी तर स्रग्वीचा अर्थ आहे पवित्रं तुळस अशी आपल्या मुलांची नावं ठेवली आहेत. त्यावेळी या अनोख्या नावाचं सोशल मीडियावर मोठं कौतुक झालं होतं.

संकर्षण हा उत्तम अभिनेता आहे महाराष्ट्राचा सुपरस्टार या शोमध्ये त्याने पार्टीसिपेट केले होते. इथूनच त्याला मोठी लोकप्रियता मिळत गेली. अभिनया सोबतच तो उत्तम कवी आहे त्याच्या विदर्भ स्टाईल हटके कविता प्रेक्षकांच्या नेहमीच पसंतीस उतरल्या आहेत. सारखं काहीतरी होतंय या नाटकाचे त्याने दिग्दर्शन केले हे तर त्याची पत्नी शलाका ही चंदेरी दुनियेपासून खूप दूर असली तरी ती उत्तम चित्रकार आहे. आई बाबांचे हे सर्व गुण त्यांच्या ह्या मुलांमध्ये देखील येवोत ही सदिच्छा. संकर्षण परदेशात आपल्या नाटकांचे प्रयोग करून नुकताच आपल्या घरी पोहचलेला पाहायला मिळतोय. काल सोमवारी २७ जून रोजी पार पडलेल्या या वाढदिवसाच्या सोहळ्यानिमित्त कु स्रग्वी आणि चि सर्वज्ञ यांना खूप खूप शुभेच्छा.