अभिनय आणि दिग्दर्शन या दोन्ही गोष्टी भिन्न जरी असल्या तरी या क्षेत्रात अनेक कलाकार मंडळी सहजतेने वावरताना पाहायला मिळतात. मालिका विश्वातून सहाय्यक ते विनोदी भूमिका साकारणारा संकर्षण कऱ्हाडे हा देखील आता एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘सारखं काहीतरी होतंय’ या नाटकातून संकर्षण कऱ्हाडे आता दिग्दर्शक म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकण्याचे धाडस करताना प्रशांत दामले यांनी त्याला प्रोत्साहन दिलेले पाहायला मिळत आहे. सारखं काहीतरी होतंय या नाटकाच्या विषयाची सुरुवात झाली ती किचन कल्लाकारच्या मांचावरूनच.

किचन कल्लाकार या शोमध्ये संकर्षण कऱ्हाडे सूत्रसंचालन करताना दिसतो तर प्रशांत दामले परिक्षकाची बाजू सांभाळताना दिसले. इथेच संकर्षणने आपल्या प्रोजेक्टबाबत प्रशांत दामले यांच्याशी बोलणे केले. प्रशांत दामले यांनी लगेचच होकार कळवल्यावर या नाटकाचा ‘तूच डायरेक्टर..’ असा शिक्कामोर्तब केला. अर्थात ध्यानीमनी नसताना आपण नाटकाचे दिग्दर्शन करणार हा अनुभव संकर्षण साठी नव्या वाटेवर घेऊन जाणारा ठरला आहे. संकर्षण कऱ्हाडेने आजवर अभिनयासोबतच सूत्रसंचालन, लेखन आणि कविता देखील केलेल्या पाहायला मिळाल्या आहेत त्यामुळे त्याच्यासाठी हे आव्हान फारसं कठीण ठरणारं नव्हतं याचा विश्वास प्रशांत दामले यांना होता. वर्षा उसगावकर, प्रशांत दामले आणि अशोक पत्की ह्या कसलेल्या कलाकारांसोबत काम करताना काय सांगू, कसं सांगू, सारखं काहीतरी होतंय असे संकर्षण आवर्जून म्हणताना दिसतो. सारखं काहीतरी होतंय हे नवं कोरं नाटक येत्या २५ मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. वर्षा उसगावकर आणि प्रशांत दामले अनेक वर्षानंतर नाटकातून एकत्रित पाहायला मिळणार आहेत.

या नाटकासाठी वर्षा उसगावकर आणि प्रशांत दामले हे देखील तितकेच उत्सुक असलेले पाहायला मिळत आहेत. नाटकाच्या संगीताची धुरा अशोक पत्की यांनी सांभाळली असल्याने ते उत्कृष्टच होणार याची खात्री आहे. या नाटकातून संकर्षण कऱ्हाडे प्रथमच दिग्दर्शक म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे त्यामुळे या नाटकासाठी तोही तेवढाच उत्सुक आहे. दिग्दर्शन क्षेत्रात पहिलं पाऊल अशी एक दिलखुलास पोस्ट त्याने सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्याच्या या पदार्पणाबद्दल मराठी सृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केलेला पाहायला मिळतो आहे. माझी तुझी रेशिमगाठ आणि किचन कल्लाकार या मालिका आणि रिऍलिटी शो सोबतच संकर्षण तू म्हणशील तसं या नाटकातून अभिनय साकारताना दिसत आहे. मालिकेत यश आणि समीरची जोडी प्रेक्षकांना खूपच भावली आहे तर किचन कल्लाकार या शोची सूत्रसंचालन म्हणून त्याने चोख जबाबदारी सांभाळली आहे त्यामुळे त्याने दिग्दर्शित केलेलं सारखं काहीतरी होतंय हे आगामी नाटक हिट ठरणार अशी आशा आहे. या नाटकासाठी संकर्षण कऱ्हाडेचे खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा…