Breaking News
Home / जरा हटके / लंडनमध्ये संकर्षणला भेटलेली व्यक्ती आहे तरी कोण? याकारणामुळे जुळलंय आमचं म्हणत केली पोस्ट

लंडनमध्ये संकर्षणला भेटलेली व्यक्ती आहे तरी कोण? याकारणामुळे जुळलंय आमचं म्हणत केली पोस्ट

माणसाला प्रवासात अनेक लोक भेटत असतात. काहीजणांचा सहवास प्रवासापुरताच असतो तर काहीजण कायम आयुष्याचा भाग व्हावेत इतके मनाला भिडतात. त्यात कलाकार तर त्यांच्या शूटिंगच्या निमित्ताने भटकंती करत असतात तेव्हा त्यांना अनेक माणसं भेटतात. अशीच एक अविस्मरणीय भेट झालीय अभिनेता संकर्षण कऱ्हाडे आणि एका खास व्यक्तीची. लंडनमध्ये संकर्षणला भेटलेली ही व्यक्ती आहे तरी कोण आणि त्या व्यक्तीचं संकर्षणच्या शब्दातून झालेलं वर्णन म्हणजे क्या बात है. म्हणूनच जुळलय आमचं असं म्हणत संकर्षणने त्याच्या सोशलमीडियावर पोस्ट केलेला फोटो बरच काही सांगून जातोय. माझी तुझी रेशीम गाठ या मालिकेतील समीर संकर्षणच्या सहजसुंदर अभिनयाने घराघरात पोहोचला.

sankarshan karhade in london
sankarshan karhade in london

काही दिवसांपूर्वी ही मालिका निरोप घेणार असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं, मात्र आता प्रेक्षकांच्या मागणीचा विचार करून वाहिनीने ही मालिका सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा समीरच्या रूपाने संकर्षण त्याच्या चाहत्यांना भेटणार आहे. माझी तुझी रेशीमगाठ मालिकेबरोबरच संकर्षण सध्या नाटक आणि नव्या सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. तू म्हणशील तसं या नाटकात तो काम करतोय. सारखं काहीतरी होतंय या नाटकाचं दिग्दर्शनही संकर्षण करत आहे. या दोन्ही नाटकांची घोडदौड सध्या जगभरात सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच संकर्षणने, मुलं लवकर का मोठी होतात या संकल्पनेवर केलेली कविता सोशलमीडियावर खूप व्हायरल झाली होती. अभिनय, लेखन, कविता, निवेदन, नाट्यदिग्दर्शन अशा अनेक क्षेत्रातील संकर्षणची मुशाफिरी त्याच्या चाहत्यांना आवडते. आता संकर्षणच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी अशी आहे की लवकरच तो सिनेमातही दिसणार आहे. याच सिनेमाच्या शूटिंगसाठी सध्या संकर्षणचा मुक्काम लंडनला आहे. संकर्षणसोबत प्राजक्ता माळी आणि वैभव तत्ववादी हे कलाकारही या सिनेमात आहेत. लंडनला शूटिंग जात असल्याचा फोटो संकर्षणने शेअर केला होता. सध्या तो लंडनमध्ये नव्या सिनेमाचं शूटिंग तर करतोच आहे पण त्याची नवनव्या माणसांना भेटण्याची धमालही सुरू आहे.

sankarshan karhade upcoming film
sankarshan karhade upcoming film

लंडनवारीत संकर्षणला एक अवलिया भेटलाय आहे. संकर्षण शूट करत असलेल्या सिनेमातील तो त्याचा सहकलाकारही आहे. या अवलिया सहकलाकारा सोबतचा एक मजेशीर फोटो संकर्षणने त्याच्या इन्स्टापेजवर शेअर केला आहे. या फोटोसोबत संकर्षणने असं लिहिलं आहे की, हा माझा लंडनमधला नवा मित्र, सहकलाकार. मुळचा पोर्तुगाजचा आहे. पण गेल्या कित्येक वर्षापासून अमेरिकेत राहत होता आणि आता तो लंडनमध्ये आलाय. महाअवलिया आहे हा. उंगलीबाज आणि एक मस्त नट. म्हणूनच आमचं जुळलंय. या फोटोमध्ये संकर्षणसोबत दिसणारा त्याचा सहकलाकार लंडन पोलिसांच्या वेशभूषेत दिसत आहे. गंमत म्हणजे संकर्षण आणि त्याच्या या नव्या मित्राने ओठ वाकडे करत मजेशीर पोझ दिली आहे. या फोटोवरूनच संकर्षण आणि त्या नव्या मित्राची किती भट्टी जमली आहे हे नेटकऱ्यांना कळत आहे. आता हा सिनेमा जेव्हा पडद्यावर येईल तेव्हा संकर्षण आणि या त्याच्या लंडनच्या मित्राचा नेमका काय सीन होता ते पडद्यावर पाहण्यात खरी मज्जा येईल.

About bolkya

Leave a Reply

Your email address will not be published.