आपण खरेदी केलेली कुठलीही वस्तू खराब झाली की त्याची वारंटी गॅरंटी पाहून आपण त्या वस्तूबाबत कंपनीकडे तक्रार करतो. तशा या कंपन्या सोयीनुसार ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण देखील करतात. मात्र जर तुम्हाला कंपनीकडून कुठलाच प्रतिसाद मिळाला नाही तर अशा वेळी ग्राहक संरक्षण कायद्याचा विचार करणे गरजेचे ठरते. ग्राहक संरक्षण कायदा ग्राहकाच्या हिताच्या बाजूने असल्याने आपली तक्रार योग्य असल्यास त्याचा लाभ त्या तक्रारदाराला निश्चितच होतो. मात्र लॉक’ डा ऊनचा तपशील सांगून अशा नामांकित कंपन्या जेव्हा ग्राहकाकडून विनाकारण पैसे उकळू लागले तर मग काय करावे?

हा प्रश्न सामान्य नागरिका प्रमाणेच ज्येष्ठ अभिनेते संजय मोने यांनाही पडला आहे. नुकतेच अभिनेते संजय मोने यांनी आपला राग व्यक्त करत एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे त्यात त्यांना आलेला एक अनुभव सांगून मला त्या आदित्य ला धडा शिकवायचा आहे असे म्हणत आहेत. हा आदित्य नेमका कोण आणि त्याने असे काय केले की संजय मोने त्याच्यावर एवढे चिडले ?….जाणून घेऊयात याबाबत अधिक… काल संजय मोने यांनी एक पोस्ट शेअर करून म्हटले की मी एका नामांकित कंपनीचं वॉशिंग मशीन गेल्या वर्षी जून महिन्यात विकत घेतलं. कालपासून कपडे धुवायला टाकल्यावर चक! चक!असा आवाज येतोय.म्हणून मी कंपनीच्या customer care ला फोन केला. warranty period मध्ये आहे असं सांगितलं. समोर आदित्य नावाचा माणूस (an executive) बोलत होता. माझं म्हणणं ऐकून घेतल्यावर तो म्हणाला “लॉक’ डा ऊन मुळे आम्ही warranty वगैरे सगळं देऊ शकत नाही. पण तुम्ही जर येणा-या माणसाचे ४७५ रु. अधिक जर काही भाग खराब झाला असेल, त्याचे पैसे द्यावे लागतील. मग warranty ला काय अर्थ आहे?

त्यावर मी त्याला सांगितलं की ग्राहक मंचाकडे तक्रार करेन त्यावर तो म्हणाला “जो करना वोह करलो. नहीँ तो लॉक’ डा ऊन के बाद आदमी आयेगा. आता यावर पुढे काय करता येईल? मला त्या “आदित्य”ला धडा शिकवायचाय. लॉक’ डा ऊन काही आपण नाही घोषित केला ना? आपल्या भल्या साठी तो आहे. शिवाय त्यांनी विक्री बंद केली नाहीये..ती चालूच आहे.पुढे काय करू?यावर फालतू विनोदी उत्तरं नकोत.. ” असं म्हणून त्यांनी आपल्या चाहत्यांकडून उत्तर मागितले आहे. संजय मोने यांच्या या प्रश्नावर अनेकांनी ग्राहक तक्रार केंद्रात जाण्याचा सल्ला दिला आहे तर काहींनी अनेक उपाययोजना सांगून कंपनीशी वारंवार संवाद साधण्याचा सल्ला दिला आहे. मात्र संधीचा फायदा घेणाऱ्या अशा कंपन्या कधी सुधारतील ? हा प्रश्न उपस्थित होतो. अगदी सामान्य नागरिकांना देखील अशा कित्येक संकटाला सामोरे जावे लागते आहे. मात्र त्यातूनही अशी संधी साधू लोकं पावलोपावली आपली वाट अडवून ठेवणारी आहेत. कायदा आहे मात्र तो कधी अंमलात येतो की नाही हाच मोठा प्रश्न आहे. त्यामुळे आज आणि उद्याही सामान्य माणूस असाच भरडला जाणार हे सत्य मान्य करावेच लागेल…