को’ रो’ ना महामारीचा फटका तसा सर्वच व्यवसायांवर बसला. मात्र यातही सर्वात जास्त त्रास हा कलाकारांना झाला वर्षभरापासून कलाकार मंडळी बसून होती त्यात आता नवीन निर्बंध लागल्याने सुरु झालेलया कामांवरही गदा आली आहे. अशात ५०% आसन क्षमतेने सुरू असलेले चित्रपट गृह आता पुन्हा एकदा बंद होऊन नुकतीच रुळावर आलेली गाडी पुन्हा घसरणार का असा प्रश्न अनेक कलाकारांना पडला आहे. अशात आता काही जिल्ह्यांमध्ये नाटकांचे प्रयोग रद्द केल्याची एक बातमी समोर येत आहे.

नुकतेच नव वर्षाचे आगम झाले. सर्वांनी नवीन वर्षाचे स्वागत अगदी जल्लोषात केले. मात्र यामुळे आता कोरोनाचा प्रादुर्भाव आणखीन वाढला. भारतातच नाही परदेशात देखील ह्याहून बिकट परिस्तिथी आहे आता कुठेतरी परिथिती आटोक्यात येण्यासाठी नियम लावणे देखील अनिवार्य झाले आहे. पण कठोर निर्बंध लावण्यापेक्षा वेगळा मार्ग अवलंबवावा असे अनेकांचे मत आहे. त्यामुळे शासनाने टाळेबंदी न करता नियम अधिक कठोर केलेत. तसेच कोल्हापूर, सातारा आणि रत्नागिरी या ठिकाणी ५० प्रेक्षकांना परवानगी असल्याने काही नाटकांचे प्रयोग रद्द करण्यात आले आहेत. त्यातीलच एक ‘वऱ्हाड निघाले लंडनला’ नाटकाचे प्रयोग रद्द करण्यात आलेत. या नाटकात अभिनेता संदीप पाठक हा मुख्य भूमिकेत आहे. कोल्हापूर, सातारा आणि रत्नागिरीमध्ये फक्त ५० व्यक्तींना मुभा देण्यात आल्याने हे प्रयोग रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. आपल्या नाटकाचे प्रयोग रद्द झाले असल्याची माहिती संदीपने स्वता त्याच्या ट्विटर अकाऊंट वरुन दिली आहे. त्यात त्याने नाटकांच्या प्रोयोगाबाबत व्यथा मांडली आहे.

अभिनेता संदीप पाठक याने ट्विट करत लिहिले आहे की, “कोल्हापूर भागात नाट्यगृहात 50% आसनक्षमतेच्या ऐवजी फक्त 50 प्रेक्षकांना परवानगी. कसं परवडणार???? म्हणून आम्ही कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी ह्या ठिकाणचे वऱ्हाड चे प्रयोग रद्द करत आहोत.क्षमस्व” संदिपचा दांडगा अभिनय सर्वांनीच पाहिला आहे. अशात तो एक उत्तम विनोदी कलाकार देखील आहे. त्याने आजवर अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. त्याच्या अभिनयातील कारकिर्दी विषयी बोलायचे झाल्यास २००४ साली श्वास या चित्रपटातून तो पहिल्यांदा रुपेरी पडद्यावर झळकला. त्यानंतर त्याने एक डाव धोबी पछाड, वन रूम किचन, पोस्टर गर्ल अशा अनेक चित्रपटांमध्ये अभिनय केला. नाटकांच्या प्रयोगासाठी वाहतुकीचा खर्च, कलाकार मंडळी आणि वादक यांचा पगार तसेच नाट्यगृहांची भाडे देखील ह्या निर्णयामुळे भरता येणार नाहीत. मोठा तोटा सहन करावा लागण्यापेक्षा न करणेच योग्य ठरेल अशी खंत व्यक्त होताना पाहायला मिळत आहे.