मराठी बिग बॉसचा तिसरा सिजन नुकताच संपला या सिजनने हिंदी बिग बॉसला देखील टीआरपीच्या बाबतीत तगडी टक्कर दिलेली पाहायला मिळाली. जय दुधाने, विशाल निकम, विकास पाटील हे सदस्य ट्विटरवर जोरदार प्रसिद्धी मिळवताना दिसले. तर हिंदी बिग बॉसने सध्या अभिजित बिचुकले यांना घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री देऊन प्रेक्षकांचे लक्ष्य वेधून घेतलेले पाहायला मिळते आहे. हिंदी बिग बॉसमुळे गेल्या काही दिवसांपासून अभिजित बिचुकले हे नाव आता संपूर्ण भारतभर पसरले आहे.

देवोलीना सोबतची मैत्री असो वा किस मागण्यावरून झालेला वाद यामुळे अभिजित बिचुकले सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवत होते. अर्थात बिग बॉसच्या घरातील त्यांचे वागणे प्रेक्षकांचे मनोरंजन करत असले तरी या ना त्या कारणावरून बिचुकलेना सलमान खानचा ओरडा खावा लागला आहे. काही दिवसांपूर्वी विकेंड वॉर मध्ये सलमान समोरच अभिजित बिचुकले यांनी जांभई दिली होती. माझ्यासमोर असं काही करायचं नाही, तुला झोप येत असेल तर जाऊन झोप असे सलमान बिचुकलेना ओरडून म्हणाला होता. या आठवड्यात देखील बिचुकले सलमान खानचा ओरडा खाताना दिसत आहेत. बिचुकलेंनी ह्या आठवड्यात देवोलीनासोबत वाद घातला होता त्यावरून त्यांनी शिव्या दिल्या होत्या याची आठवण करून देत सलमान म्हणतो की ह्या शिव्या तुझ्या कुटुंबाला दिल्या तर तुम्हाला कसं वाटेल?…मी ही तुला वॉर्निंग देतो , तू जर बोललास तर मी घरात येऊन तुला मारेल….सलमान खानचे हे बोलणे ऐकून बिचुकलेंचा पारा मात्र भलताच चढला आणि भाड में गया अपना ये शो..ऐसें शोमें मै रुकना भी नहीं चाहता, खोलो दरवाजा…असे म्हणत बिचुकले घराबाहेर जाण्यासाठी तिथून निघतात…

यानंतर अभिजित बिचुकले खरंच बिग बॉसचा शो सोडणार का याची उत्सुकता आहे. आज रात्री बिग बॉसच्या घरात बिचुकलेंनी घेतलेल्या निर्णयावर सलमान खान काय म्हणतो हे पाहणे रंजक ठरणार आहे. दरम्यान सलमान खान करण कुन्द्राची देखील पोलखोल करतो. तेजस्वि प्रकाश आणि करण कुन्द्रा हे दोघेही बिग बॉसच्या घरात एकत्र आलेले पाहायला मिळाले. त्यांची जुळून आलेली केमिस्ट्री प्रेक्षकांना देखील आवडली असली तरी करण आणि तेजस्वि यांच्यात खरं प्रेम नसल्याचे बोलले जाते. त्यावरूनच करण तेजस्विला उमर रियाजची माफी मागायला लावतो हे सलमानला पटले नाही. करण तेजस्वीचा बॉयफ्रेंड असूनही त्याने तुझी कधीच मदत केली नाही हा खुलासा करताच तेजस्विला रडू कोसळते. करण आणि तेजस्वी यांच्यातील दरी आता या खुलास्यावर अधिकच वाढलेली पाहायला मिळणार का हे येत्या काही दिवसातच समजेल. तूर्तास बिचुकले बिग बॉसच्या घरातून बाहेर पडणार का याची अधिक उत्सुकता आहे.