काल २ फेब्रुवारी २०२२ रोजी ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. आज दुपारी ११ वाजता त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी त्यांच्या घरी ठेण्यात आले होते. तर दुपारी २.३० वाजता पारसीवाडा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत असे रमेश देव यांचे सुपूत्र अजिंक्य देव यांनी माहिती दिली आहे. रमेश देव यांना बुधवारीच दवाखान्यात दाखल केले होते मात्र ते आमच्यासोबत आजच्या रात्री नसणार याची जराशीही कल्पना आम्हाला नव्हती अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केलेली पाहायला मिळाली.

रमेश देव आणि सीमा देव या चिरतरुण जोडीची नेहमी प्रशंसा करण्यात आली होती. जगाच्या पाठीवर या चित्रपटातून नलिनी सराफ आणि रमेश देव एकत्रित झळकले होते. त्यावेळी नलिनी सराफ यांच्यावर रमेश देव यांचे प्रेम जडले. पुढे वरदक्षिणा या चित्रपटात काम करत असताना त्यांनी नलिनीला प्रपोज करण्याचे ठरवले. आणि एका सीनमध्ये बैलगाडीत बसले असताना त्यांनी नलिनी यांना लग्नासाठी मागणी घातली. हा चित्रपटाचा एक भाग असावा असा समज त्यावेळी नलिनी सराफ यांना वाटला होता. त्यानंतर १९६३ साली कोल्हापूर येथे त्यांनी मोठ्या थाटात लग्न केले. त्यांचा लग्नाचा हा सोहळा त्यावेळी खूप गाजला होता कारण त्या लग्नाला हजारोंच्या संख्येने त्यांच्या चाहत्यांनी हजेरी लावली होती. काही वर्षांपूर्वी रमेश देव आणि सीमा देव यांची एक गोड मुलाखत घेण्यात आली होती. लग्नाला ५३ वर्षे झाली आहेत आणि मी आता कधीही या जगाचा निरोप घेऊ शकतो असे म्हणून त्यांनी एक हळवा कोपरा पत्नी सीमा देव यांच्याकडे व्यक्त केला होता. रमेश देव यांनी सीमा देव यांची नेहमीच काळजी घेतली आहे.

अगदी दौर्यावर असतानाही ते त्यांची काळजी घेत असत. या मुलाखतीत त्यांनी एक ईच्छा व्यक्त करत म्हटले की, ‘इतकी वर्षे तू मला साथ दिलीस, आता माझी एक ईच्छा पूर्ण कर, मी आता ९३ वर्षाचा आहे मी कधीही जाईन काय कसं सांगता येत नाही, तर माझी अशी एक शेवटची ईच्छा आहे की माझा शेवटचा श्वास तुझ्या मांडीवर जावा…एवढीच ईच्छा आहे’ रमेश देव असे म्हणताच सीमा देव यांच्या डोळ्यांच्या कडा मात्र ओघळू लागल्या आणि निःशब्द होऊन मान नकारार्थी डोलावु लागल्या. त्यावर रमेश देव म्हणाले की, हे बघ आपण काय अजरामर होऊन आलेलो नाही पण मला ती ईच्छा भयंकर आहे की तुझ्या मांडीवरती श्वास सोडावा. रमेश देव आणि सीमा देव यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्या दोघांचे हे निस्सीम प्रेम पाहून अनेकांना आपले अश्रू अनावर होत आहेत.